शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही रेंगाळणार राष्ट्रीय महामार्गाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:04 IST

गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या गडचिरोली शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळले आहे. धानोरा आणि चंद्रपूर मार्ग अर्धवट खोदून धिम्या गतीने काम सुरू असल्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणे अशक्य झाले आहे.

ठळक मुद्देकामाची गती धिमी : पावसाळा लागताच वाहतुकीचा अडथळा वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या गडचिरोली शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळले आहे. धानोरा आणि चंद्रपूर मार्ग अर्धवट खोदून धिम्या गतीने काम सुरू असल्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणे अशक्य झाले आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात शहरवासीयांना वाहतुकीच्या कोंडीसह अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.छत्तीसगड सीमेवरील मुरूमगाव ते चंद्रपूर अशा २६२ किलोमीटर लांबीच्या या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० चे गडचिरोली शहरातील काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी हाती घेण्यात आले. परंतु कंत्राटदाराच्या काम करण्याच्या धिम्या गतीमुळे हे काम पूर्ण होण्यासाठी अजून काही महिने लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय महामार्गाचे काम पाहणाºया अधिकाऱ्यांचेही त्यावर कोणतेच नियंत्रण नसल्याचे दिसून येते.शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाची रूंदी जास्त नसली तरी या मार्गावर दुभाजक राहणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचे मार्ग लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. सध्या एका बाजुचा मार्ग खोदून त्यावर गिट्टी, मुरूम व चुरीचा थर टाकणे सुरू आहे. त्यावर सिमेंटीकरण झाल्यानंतरच दुसºया बाजुचा मार्ग खोदला जाईल. ऐन पावसाळ्यात एका बाजुचा रस्ता खोदलेला राहिल्यास त्यात पाणी साचेल. चिखलामुळे वाहने घसरून खोदलेल्या रस्त्याच्या पाण्यात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.हिवाळा आणि उन्हाळ्यासारख्या मोकळे हवामान असणाºया काळातच हे काम तातडीने मार्गी लागले नसताना पावसाच्या अडथळ्यात या कामाला पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.शेकडो झाडांची कटाईशहराच्या चंद्रपूर मार्गावर कॉम्प्लेक्स एरियापर्यंत अनेक वर्ष जुनी मोठमोठी झाडे रस्त्याच्या दुतर्फा होती. ही झाडे महामार्गाच्या कामासाठी कापण्यात आली. या मार्गाला पुन्हा ते वैभव प्राप्त करून घेण्यासाठी नवीन रस्त्याच्या बाजुला पुन्हा सक्तीने झाडे लावावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग