लोकमत न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम : आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर झिमेला फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूने कललेला एक झाड रविवारी पहाटेच्या सुमारास कोसळले. त्यामुळे पहाटे ५ वाजतापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. जवळपास दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत झाली नाही. त्यामुळे सात तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याने चारचाकी वाहनांना प्रतीक्षा करावी लागली.आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गालगत अनेक झाडे रस्त्याच्या बाजूने कललेली आहेत. ही झाडे रस्त्यावर केव्हाही कोसळू शकतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळवाऱ्यासह पाऊस झाल्यास या भागातील अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडण्याची शक्यता आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास झिमेला फाट्याजवळ झाड कोसळल्याने या मार्गाने आवागमन करणारी अनेक वाहने रस्त्यात अडकून पडली. यामध्ये चारचाकी वाहने अधिक होती.मार्गावर झाड कोसळल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु कोणताही अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही. दुपारी १२ वाजेपर्यंत वाहनधारकांना ताटकडत राहावे लागले. शेवटी स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाडाची विल्हेवाट लाऊन मार्ग मोकळा करण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.विशेष म्हणजे, याच मार्गावर झिमेला परिसरात आणखी दोन झाडे रस्त्याच्या बाजूने कललेली आहेत. ही झाडे वादळवाºयाने केव्हाही रस्त्यावर कोसळू शकतात. त्यामुळे भविष्यातसुद्धा वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने या मार्गावरील रस्त्याच्या बाजूने कललेल्या सर्व झाडांची विल्हेवाट संबंधित विभागाने लावावी, अशी मागणी झिमेलासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.पैैसे गोळा करून मजूर लावले कामालाझिमेला फाट्याजवळ रस्त्यावर कोसळलेल्या झाडामुळे तब्बल सात तास वाहतूक ठप्प झाली होती. परंतु झाडाची विल्हेवाट लावण्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने अखेर रस्त्यात अडकलेल्या वाहनधारकांनी प्रति वाहन ५० रूपये गोळा करून स्थानिक मजुरांच्या मदतीने झाडाची विल्हेवाट लावली.
झाडाने अडविला राष्ट्रीय महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:00 IST
आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गालगत अनेक झाडे रस्त्याच्या बाजूने कललेली आहेत. ही झाडे रस्त्यावर केव्हाही कोसळू शकतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळवाऱ्यासह पाऊस झाल्यास या भागातील अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडण्याची शक्यता आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास झिमेला फाट्याजवळ झाड कोसळल्याने या मार्गाने आवागमन करणारी अनेक वाहने रस्त्यात अडकून पडली. यामध्ये चारचाकी वाहने अधिक होती.
झाडाने अडविला राष्ट्रीय महामार्ग
ठळक मुद्देसात तास खोळंबा : आलापल्ली-सिरोंचा महामार्गावरील झिमेलाजवळची घटना