शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नाकावर रूमाल अन् चोरीचा मामला

By admin | Updated: December 6, 2014 22:47 IST

आरमोरी कृषी उत्पन्न समितीची उप बाजारपेठ असलेल्या देसाईगंज येथील धानगंजात शेतकऱ्यांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथे मूत्रिघराची सुविधा नसल्याने व धान्याची आवक वाढल्याने

शेतकरी अडचणीत : देसाईगंजच्या धानगंजात सारे आतबट्ट्यातील काममहेंद्र चचाणे - देसाईगंजआरमोरी कृषी उत्पन्न समितीची उप बाजारपेठ असलेल्या देसाईगंज येथील धानगंजात शेतकऱ्यांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथे मूत्रिघराची सुविधा नसल्याने व धान्याची आवक वाढल्याने सर्व रस्ते बंद झाल्याने धान्यमंडीत लघुशंकेला जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी होऊन येथे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नाकावर रूमाल लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तसेच आता व्यापारी शेडमध्ये धान्याचे मोजमाप करीत असल्याने चोरांनाही सुगीचे दिवस या धान्यमंडीत आल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. आज शनिवारी दुपारी लोकमतने या भागात स्टिंग आॅपरेशन केले, त्यावेळी हा सारा धक्कादायक प्रकार समोर आला. बाजार समितीचे कर्मचारी मात्र कुणाचीही तक्रार नाही. तक्रार आली तर आम्ही हमालच काय कुणालाही कामावरच ठेवत नाही, असे सांगून मोकळे होण्याच्या तयारी असल्याचे दिसून आले आहे.धान गंजात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दूरदूरून आलेले शेतकरी येथे मुक्कामी थांबून आपल्या धान्याची रखवाली करीत असल्याचे दिसून आले. महिनाभरापूर्वी या धान्यमंडीत सर्वच दलाल व व्यापाऱ्यांकडे इलेक्ट्रॉनिक्स काटे लागले आहे. पूर्वी बाहेर होणारा धान्याचा काटा आता शेडमध्ये होत आहे. शेतकऱ्यांचा माल आतमध्ये घेतल्यावर त्यात पाला केला जातो व काट्यावर नेईपर्यंत पोत्यातील बरेच धान्य खाली पडून त्याचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे, असे दिसून आले.या बाजार समितीत शेतकऱ्यांना राहण्यासाठी कुठलिही निवासी व्यवस्था नाही. पिण्याच्या पाण्याचीही चांगल्या दर्जाची व्यवस्था नाही. बाजार समितीच्या आवाराकडे येणाऱ्या रस्त्यांवर धान्याचे पोते असल्याने अनेक शेतकऱ्यांना बाहेर जाणे शक्य होत नाही. त्यामुळे बाजार समितीचे मैदान सध्या लघुशंकेचे ठिकाण झाले आहे. येथे प्रचंड दुर्गंधी पसरून आहे. गंजातील हमाल शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत झाडनच्या रूपात धानाची विल्हेवाट लावत आहे. हे झाडलेले धान नंतर बाहेर नेऊन विकले जातात. येथूनच चोरीला पाय फुटत आहे, असे शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.