शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपंचमी सण; ‘नागुला चाैथी’साठी वारुळांजवळ गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 12:15 IST

Gadchiroli News सिराेंचा शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये तेलगू भाषिक महिलांनी ‘नागुला चाैथी’ हा सण बुधवारी साजरा केला.

ठळक मुद्दे सिराेंचासह ग्रामीण भागात तेलगू भाषिक महिलांनी केली पूजा

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिराेंचा शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये तेलगू भाषिक महिलांनी ‘नागुला चाैथी’ हा सण बुधवारी साजरा केला. गावाबाहेर असलेल्या वारुळांवर पूजाअर्चा करण्यासाठी महिलांनी गर्दी केली हाेती. माेठ्या उत्साहात नागुला चाैथी हा सण साजरा करण्यात आला.

मराठी भाषिक जसे नागपंचमी सण साजरा करतात. त्याच धर्तीवर तेलगू महिला नागुला चाैथी हा सण साजरा करतात. दिवाळी पाडव्याच्या दाेन दिवसानंतर हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. सिराेंचासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागुला चाैथी सण बुधवारी साजरा करण्यात आला. या दिवशी महिला पहाटे उठून घरातील कामे आटाेपतात. आंघाेळ करुन घरातील पूजेनंतर नागुला चाैथी पूजेसाठी साहित्याची जुळवाजुळव करुन प्रसाद, फळ, दूध व अन्य साहित्य वारुळाजवळ घेऊन जातात. वारुळपूजेनंतर जवळच्या मंदिरात जाऊन तेथील नागदेवतासह अन्य देवीदेवतांची पूजाअर्चा करतात. गावांमधील महिला आपापल्या परिसरातील वारुळावर हा धार्मिक विधी पार पाडतात. सिराेंचा येथील प्रभा १ व २ मधील महिलांनी वनविभागाच्या आवारातील माेकळ्या जागेत असलेल्या वारुळावर पूजाअर्चा केली. त्यानंतर जवळच्या सिद्धेश्वर हनुमान मंदिरातील देवांचे पूजन केले. घरी जाऊन प्रवेशद्वारावर पूजन करीत प्रसाद अर्पण केला. त्यानंतर घरात प्रवेश केला व कुटुंबीयांना प्रसादाचे वितरण केले. सिराेंचा तालुका मुख्यालयासह ग्रामीण भागातही नागुला चाैथी सण साजरा करण्यासाठी वारुळांजवळ महिलांची गर्दी उसळली हाेती.

तीन प्रकारचा प्रसाद केला तयारनागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागाच्या फण्यावर असलेल्या चित्राप्रमाणे वारुळावरील त्रिकाेणी आकाराच्या तीन बिळांची पूजाअर्चा व आरती महिला करतात. फळ, फूल, धूप, गाईचे दूध प्रसाद म्हणून वाटप करतात. परंतु तीन प्रकारच्या प्रसादाला विशेष महत्त्व असते. यामध्ये तीळ व साखरमिश्रीत प्रसाद, भिजवलेली मूगडाळ, भिजू घातलेले तांदूळ व साखरेपासून तयार केेलेला प्रसाद आदी तीन प्रकारच्या प्रसादाचा समावेश आहे. नागुला चाैथीनिमित्त महिलांनी तीन प्रकारचा प्रसाद तयार केला हाेता. हा प्रसाद कुटुंबांसह अनेक परिसरातील अनेक लाेकांना वितरित केला.

टॅग्स :Socialसामाजिक