शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

नगर पंचायतींमध्ये सत्तापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:34 IST

कुरखेडा, चामोर्शी, भामरागड व सिरोंचा येथील नगर पंचायतीत मंगळवारी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांची फोडाफोडी करीत अध्यक्षपद आपल्याकडे खेचले. तर ज्या सदस्यांनी नगराध्यक्षपदासाठी समर्थन दिले, त्यांना उपाध्यक्षपदाची खुर्ची मिळाली.

ठळक मुद्देनगरसेवकांची फोडाफोडी : चामोर्शी, भामरागडात भाजपाचा नगराध्यक्ष तर कुरखेडा, सिरोंचात उपाध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुरखेडा, चामोर्शी, भामरागड व सिरोंचा येथील नगर पंचायतीत मंगळवारी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांची फोडाफोडी करीत अध्यक्षपद आपल्याकडे खेचले. तर ज्या सदस्यांनी नगराध्यक्षपदासाठी समर्थन दिले, त्यांना उपाध्यक्षपदाची खुर्ची मिळाली. हा प्रकार भामरागड, चामोर्शी येथे घडला आहे. कुरखेडा व सिरोंचा येथे उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भाजपाने इतर पक्षाच्या सदस्यांना आपल्याकडे खेचून उपाध्यक्षपदी भाजपच्या नगरसेवकाची वर्णी लावली आहे.चामोर्शी : चामोर्शी नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदी प्रज्ञा धिरज उराडे तर उपाध्यक्ष पदी राहूल नैताम हे निवडून आले आहेत.प्रज्ञा धिरज उराडे यांनी राष्टÑवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात नुकताच प्रवेश केला. त्यांना ११ मते मिळाली. त्या विजयी झाल्या. काँग्रेसचे सुमेध तुरे यांना सहा मते मिळाली. प्रज्ञा उराडे यांना विजय गेडाम, प्रशांत एगलोपवार, प्रज्ञा उराडे, कविता किरमे, रोशनी वरघंटे, मिनल पालारपवार या भाजप नगरसेवकांसोबतच शिवसेनेच्या मंजुषा रॉय, काँग्रेसचे राहूल नैताम, सुनिल धोडरे, शामराव लटारे, मंदा सरपे यांनी मतदान केले. सुमेध तुरे यांना जयश्री वायलालवार, प्रमोद वायलालवार, सुमेध तुरे, विजय शातलवार, सविता पिपरे व अपक्ष अविनाश चौधरी यांनी मतदान केले.उपाध्यक्ष पदासाठी भाजपा समर्थीत काँग्रेसचे राहूल नैताम व काँग्रेसकडून सविता पिपरे यांनी नामांकन दाखल केले होते. राहूल नैताम यांना १२ मते मिळाली. तर सविता पिपरे यांना पाच मते मिळाली. राहूल नैताम यांना अपक्ष नगरसेवक अविनाश चौधरी यांनी मतदान केल्याने नगराध्यक्षापेक्षा एक मत जास्त मिळाले.पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, सहायक पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी आर्शीया जुही यांनी काम पाहिले. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक गोरख गायकवाड, पोलीस उपनिरिक्षक मल्हार थोरात, सुरेश गेडाम यांनी चोख बंदोबस्त ठेवला.आमदार डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने व्हुवरचना आखली होती. त्यांनी शिवसेना, राकाँ व काँग्रेसमधील चार जणांच्या गटाशी संपर्क साधून आघाडी करून निवडून लढविली. यात त्यांना यश आले. निवडीनंतर भाजपा, शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ढोलताशांच्या गजरात अध्यक्ष व उपाध्यक्षांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आमदार डॉ. होळी, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, पं.स. सभापती आनंद भांडेकर, उपसभापती आकुली बिश्वास, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, जि.प. सदस्य रमेश गेडाम, शिल्पा रॉय, ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे, रवी ओल्लालवार, रमेश भुरसे, डॉ. भारत खटी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निशांत नैताम, भिकाजी सातपुते, विलास ठोंबरे, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, केशव भांडेकर, आनंद गण्यारपवार, रवी बोमनवार, मधुकर भांडेकर, आशिष पिपरे, विनोद पेशट्टीवार, बंडू कुडवे, किशोर कुडवे, जयराम चलाख, मानिक कोहळे, साईनाथ बुरांडे, राजू चुधरी, भारती पेशट्टीवार, विनोद पेशट्टीवार, रमेश नैताम, गणेश लटारे, भैय्याजी गडकर, नुरेश नैताम आदी उपस्थित होते.कुरखेडा : कुरखेडा नगर पंचायतीत सत्तापालट होऊन भाजपाचे रवींद्र विश्वनाथ गोटेफोडे हे उपाध्यक्ष पदी निवडून आले आहेत. त्यांना १७ पैकी ९ मते मिळाली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने नगराध्यक्षाची निवड होऊ शकली नाही.उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपातर्फे रवींद्र गोटेफोडे यांनी नामांकन दाखल केले होते. तर शिवसेना-काँग्रेस आघाडीतर्फे विद्यमान नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी यांनी नामांकन दाखल केले. मागील वेळी शिवसेना-काँग्रेस व अपक्ष यांनी आघाडी करीत अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही पदे काबिज केली होती. यावेळी मात्र या आघाडीला छेद देत भाजपाने एकमेव असलेल्या अपक्ष सदस्याला आपल्या तंबूत दाखल केले. भाजपाचे सात, राष्टÑवादी काँग्रेसचा एक, अपक्ष एक असे नवीन समिकरण तयार केले. शिवसेनेचे पाच व काँग्रेस तीन नगरसेवक असलेल्या आघाडीवर एका मताने विजय प्राप्त करीत उपाध्यक्ष पद काबिज केले. निकालाची घोषणा होताच भाजपा कार्यकर्त्याने फटाक्याची आतिषबाजी करीत जल्लोष केला. यावेळी आमदार कृष्णा गजबे, माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, देसाईगंजचे न.प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, गणपत सोनकुसरे, विलास गावंडे, राम लांजेवार, सिनेट सदस्य चांगदेव फाये, नवनिर्वाचित उपाध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, गटनेता नागेश फाये, नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे, बबलु हुसैनी, नंदिनी दखने, दीपाली देशमुख, अर्चना वालदे, स्वाती नंदनवार, शाहीदा मुघल, रामहरी उगले, बंटी देवढगले हजर होते.सिरोंचा : सिरोंचा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदी मारीया जयवंत बोलमपल्ली यांची अविरोध निवड झाली. तर उपाध्यक्ष पदाकरिता निवडणूक होऊन राजू धर्मय्या पेदपेल्ली हे निवडून आले.अध्यक्ष पदाकरिता काँग्रेसकडून मारीया जयवंत बोलमपल्ली यांचा एकमेव नामांकन आल्याने त्यांची नगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदाकरिता भाजपाकडून विद्यमान नगराध्यक्ष राजू पेदापल्ली यांनी नामांकन दाखल केले. तर राष्टÑवादी काँग्रेसकडून रवीकुमार चंद्रय्या रालबंडीवार यांनी नामांकन दाखल केले. राजू धर्मय्या पेदापल्ली यांना १७ पैकी ११ सदस्यांनी मतदान केले. रवीकुमार रालबंडीवार यांना सहा मते मिळाली. राजू पेदापल्ली यांना भाजपच्या सहा, काँग्रेसच्या दोन व राष्टÑवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी मतदान केले. रालबंडीवार यांना राष्टÑवादी काँग्रेसच्या दोन, अपक्ष दोन, आविसं दोन व काँग्रेसच्या एका नगरसेवकाने असे एकूण सहा नगरसेवकांनी मतदान केले. राजू पेदापल्ली यांना भाजपच्या सीमा रामस्वामी मासतुरे, राजू धर्मय्या पेदापल्ली, गट्टू सुनिता सीतापती, बुध्दावार ईश्वरी हनुमय्या, गग्गुरी निलेश मुत्यालू, तोकला विजयकुमार तुलशीराम, राकाँचे भोगेश सतीश सडवल्ली, मगिडी सरोजना नागेश परसा संतोषी श्रीनिवास, आकुदारी बक्कु पोचम, बोलमपल्ली मारीया जयवंत यांनी मतदान केले. रालबंडी यांना राकाँच्या वनिता चंद्रय्या रालबंडी, काँग्रेसचे पठाण मुमताज बेगम हुसेन खान, आविसंचे अलोणे नरेशकुमार केशवराव, अपक्ष शेख अब्दुल रफुक, राधिका नरेश तडकलावार यांनी मतदान केले.यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ओंबासे यांनी काम पाहिले. सहायक म्हणून तहसीलदार रमेश जशवंत, मुख्याधिकारी भारत नंदनवार हजर होते. विजयानंतर जल्लोष करण्यात आला.भामरागड : भामरागडच्या नगराध्यक्ष पदी भाजपाच्या संगीता रमेश गाडगे तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे हरीदास रापेल्लीवार निवडून आले आहेत.भामरागड नगर पंचायतीत काँग्रेसचे सहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार व भाजपाचे सात सदस्य आहेत. यापूर्वी काँग्रेस-राकाँची युती होती. तेव्हा काँग्रेसचे राजू वड्डे अध्यक्ष तर राष्ट्रवादीच्या शारदा कुंबगोणीवार उपाध्यक्ष होत्या. यावेळी काँग्रेसचे हरीदास रापेल्लीवार व राष्ट्रवादीच्या बसंती दामोधर मडावी यांनी भाजपच्या संगीता गाडगे यांना समर्थन दिल्यामुळे संगीता गाडगे अध्यक्ष बनल्या. त्याबद्दल हरिदास रापेल्लीवार यांना भाजपच्या सदस्यांचे समर्थन मिळून ते उपाध्यक्ष बनले. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागी अधिकारी अतुल चोरमारे, मुख्याधिकारी हेमंत कोकोडे यांनी काम पाहिले.