शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

हत्ती कॅम्पमधील ‘आदित्य’च्या मृत्यूचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:01 IST

सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक सुमितकुमार, उपविभागीय वनाधिकारी एस. एस. पवार, कमलापूरच्या सरपंच रजनिता मडावी यांच्या समक्ष शवविच्छेदन करण्यात आले. मात्र मृत्यूचे सविस्तर कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदनादरम्यान काढण्यात आलेले अवयव फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे कमलापूरचे वन परिक्षेत्राधिकारी जे. व्ही. घुगे यांनी कळविले.

ठळक मुद्देवनाधिकाऱ्यांमार्फत अग्निसंस्कार : अवयव तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविणार

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : सिरोंचा वनविभागांतर्गत येत असलेल्या कमलापूर वन परिक्षेत्रातील हत्ती कॅम्पमध्ये आदित्य या हत्तीचा मृत्यू होण्याची घटना सोमवारी (दि.२९) घडल्यानंतर या घटनेमागील कारणांचे गूढ वाढले आहे. ते उकलण्याचे आव्हान वन विभागासमोर निर्माण झाले आहे. सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याच्यावर हत्तीकॅम्प परिसरातच अग्निसंस्कार करण्यात आले.सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक सुमितकुमार, उपविभागीय वनाधिकारी एस. एस. पवार, कमलापूरच्या सरपंच रजनिता मडावी यांच्या समक्ष शवविच्छेदन करण्यात आले. मात्र मृत्यूचे सविस्तर कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदनादरम्यान काढण्यात आलेले अवयव फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे कमलापूरचे वन परिक्षेत्राधिकारी जे. व्ही. घुगे यांनी कळविले.गेल्या १० जून रोजी मुसळधार पावसानंतर कॅम्पजवळच्या तलावात गाळ साचल्याने त्या गाळात आदित्य अडकला होता. वन कर्मचारी व माहुतांनी दुसºया दिवशी पहाटे त्याला बाहेर काढले. मात्र बाहेर निघण्यासाठी आदित्यने रात्रभर केलेल्या संघर्षामध्ये तो पूर्णपणे थकून गेला होता आणि त्यामुळे त्याची मानसिक स्थितीही ठिक नव्हती. त्याच्यावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे, नागपूर येथील वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.चित्रा राऊत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाºयांनी दिनांक २९ पर्यंत औषधोपचार केले. मात्र त्या उपचारांना आदित्यने प्रतिसाद दिला नाही. हत्ती कॅम्प परिसरात मोठा खड्डा पडून आणि त्यात लाकडे टाकून आदित्यवर अग्निसंस्कार करण्यात आले. त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषी असणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.पचनक्रिया मंदावल्याने आदित्यचा मृत्यू?कमलापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन खेमलापुरे, एटापल्लीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.गव्हाणे, अहेरी पंचायत समितीचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन पावडे यांच्यामार्फत आदित्यच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात चयापचय क्रिया मंदावल्याने शरीरातील इतर अवयवांवर ताण येऊन आदित्यचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला.

टॅग्स :forestजंगल