शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सासुरवाडीला आलेल्या जावयाची विष पिऊन गूढरित्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2022 19:29 IST

Gadchiroli News पत्नीला आणायला सासुरवाडीला आलेल्या जावयाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना आष्टीत मंगळवारी (दि. ३१) घडली.

ठळक मुद्देनोव्हेंबरमध्ये झाले होते लग्न

गडचिरोली : पत्नीला आणायला सासुरवाडीला आलेल्या जावयाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना आष्टीत मंगळवारी (दि. ३१) घडली. योगेश आकाराम बन्सोड (वय २४, रा. इंदिरा नगर, नागपूर) असे मृत जावयाचे नाव आहे. ध्यानीमनी नसताना घडलेल्या या प्रकाराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून, या आत्महत्येमागील गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

योगेश बन्सोड हे ३० मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान आष्टी येथील त्यांचे सासरे धनराज देठे यांच्या घरी पत्नी स्नेहा हिला स्वगृही नागपूरला नेण्यासाठी आले होते. सर्वजण झोपी गेल्यानंतर पहाटे चार वाजताच्या सुमारास जावई उलटी करीत असल्याचा आवाज आल्याने सासू सुमित्रा देठे खाली आल्या. त्यांनी विचारणा केली असता जावयांनी विषयुक्त औषधी घेतल्याचे सांगितले. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता, मी पानठेल्यातून पुडी घेतली व खाल्ली असे उत्तर योगेश बन्सोड यांनी दिले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. यावरून योगेशने आत्महत्येचा निर्णय आधीच घेतला होता का? त्यामागील कारण काय? असे प्रश्न चर्चेचा विषय झाले आहेत.आष्टी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, आत्महत्येचे नेमके कारण काय, याचा तपास सुरू केला आहे.

मध्यरात्रीपर्यंत सुरू होत्या गुजगोष्टीयोगेश आणि स्नेहाचे गेल्या नोव्हेंबर महिन्यात लग्न झाले होते. सासऱ्यांनी जावयासाठी पाहुणचार केला होता. जेवण झाल्यानंतर योगेश व स्नेहा बाहेर फिरायला गेले. रात्री ११ वाजता घरी परतले. त्या दाम्पत्याची झोपण्याची व्यवस्था घरात करून सासू-सासरे घराच्या छतावर झोपी गेले. रात्री १ वाजेपर्यंत पती-पत्नी सुखी संसाराचे स्वप्न रंगवीत गुजगोष्टी करीत राहिले; पण तेथून दोन तासांतच जावयाने विष घेतले.

टॅग्स :Deathमृत्यू