शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

मुस्लीम समाजाची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास तीन हजार मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. हाती फलक घेत आणि विविध नारे लावत निघालेला हा मुस्लिम समाजाचा मोर्चा अभूतपूर्व ठरला.

ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध : मोर्चात तीन हजारांवर नागरिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मुस्लीम समाजाच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास तीन हजार मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. हाती फलक घेत आणि विविध नारे लावत निघालेला हा मुस्लिम समाजाचा मोर्चा अभूतपूर्व ठरला.जिल्हाभरातील मुस्लिम समाजाचे नागरिक सकाळपासून गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी भवनात जमले होते. यावेळी उपस्थित नागरिकांना मुस्लिम समाजाचे नेते भारतीय मुस्लिम परिषदेचे जावेद पाशा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, एजाज शेख आदींनी मार्गदर्शन केले. त्यानंतर इंदिरा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. हातात तिरंगी झेंडा घेतलेले नागरिक केंद्र शासनाच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात घोषणा देत होते.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा पोहोचल्यानंतर सभेत रूपांतर झाले. त्या ठिकाणी मुस्लिम समाजातील काही नागरिकांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना सादर करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, एजाज शेख, डॉ.चंदा कोडवते, रोहिदास राऊत, भावना वानखेडे, हसनअली गिलानी, नगरसेवक सतीश विधाते, महेंद्र ब्राह्मणवाडे, रजनिकांत मोटघरे आदी हजर होते. शासनाने कायद्यात सुधारणा केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.मोर्चाचे नेतृत्व समशेर खान पठाण, वसीम खान पठाण, हाजी इब्राहिम रहमततुला, सय्यद बाबु कादरी, लियाकत सय्यद, मुबारक सय्यद, सोहेब पटेल, एजाज खॉ पठाण, जमीर कुरेशी, जुबेर खान, शहबाद शेख, हामीद शेख, वसीम शेख, बरकत शेख, मुस्ताक शेख, शुजा खान, फारूख शेख, इम्ररान मदनी, शोहेब खान, सर्फराज शेख, इसराईल पठाण, रहिम शेख, इकरार कुरेशी, आपताब खान आबिद सय्यद, हानी समीर सय्यद, सुलेमान लाखानी आदींनी केले.चोख बंदोबस्त, वाहतूकही वळविलीमोर्चादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मोर्चादरम्यान न्यायालय ते इंदिरा गांधी चौकापर्यंत चारचाकी वाहने, ट्रकला बंदी घालण्यात आली होती. ही वाहतूक सेमानामार्गे वळविण्यात आली होती. आयटीआय चौक, बाजार चौक, जिल्हा परिषद, सर्कीट हाऊस मार्ग या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवून व या मार्गाने वाहने येणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेदरम्यान या मोर्चासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फूल देऊन सन्मान करण्यात आला.या आहेत मागण्याकेंद्र शासनाने पारित केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा पूर्णपणे असंवैधानिक आहे, यामुळे देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात येण्याची शक्यता असल्याने हा कायदा रद्द करावा अशी मागणी निवेदनातून केली. तसेच दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना सरकारकडून पोलीस बळाचा वापर करून विद्यापीठातील निर्दोष विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, त्याचाही निषेध करण्यात आला.

टॅग्स :Socialसामाजिक