शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

अविवाहित तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून; वादावरून झाला घात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 18:34 IST

कुरखेडा तालुक्यातील घटना : चाैकशीकरिता काहीजण ताब्यात.

गाेपाल लाजूरकर, गडचिराेलीगडचिराेली : सायंकाळी घराबाहेर पडलेल्या अविवाहित तरुणाचा दुसऱ्या दिवशी पहाटे गावालगतच रस्त्यावर मृतदेह तीक्ष्ण हत्याराने खून झालेल्या स्थितीत आढळून आला. ही खळबळजनक घटना कुरखेडा तालुक्याच्या चिखली- वडेगाव मार्गावर शुक्रवार, ९ ऑगस्ट राेजी पहाटे उघडकीस आली.

जितेश भोवनदास पगडवार (२८) रा. चिखली असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मृतक हा गुरूवारी सायंकाळी घराबाहेर पडला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत ताे घरी परतला नाही. यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शाेध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शाेध घेतला जात हाेता. अखेर शुक्रवारी पहाटे चिखली- वडेगाव मार्गावर स्मशानभूमी परिसरात सिडीवर्कजवळ जितेशचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराचे वार असून कपडेसुद्धा रक्ताने माखलेले आढळले. याबाबत नागरिकांनी कुरखेडा पाेलिस स्टेशनला माहिती दिली. तेव्हा ठाणेदार महेंद्र वाघ यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी पाेलिसांनी काही युवकांना चाैकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे. पाेलिसांनी अज्ञात आराेपीविराेधात गुन्हा दाखल केलेला आहे. 

वादावरून झाला घात?जितेशचा गावातील काही युवकांशी वैयक्तिक कारणावरून वाद हाेता. या वादातूनच त्याचा खून झाला असावा,  अशी कुजबुज घटनास्थळी हाेती. मात्र, सखाेल चाैकशीनंतरच या प्रकरणाचा उलगडा हाेणार आहे. त्यादृष्टीने पाेलिस तपास सुरू आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली