दीक्षा ही मुलगी चंद्रपूर येथे बी.फॉर्म द्वितीय वर्षाला शिकत होती. दीड वर्षांपासून लॉकडाऊनमुळे ती येणापूर येथे आली होती. गावातीलच स्टुडिओ व सेतुकेंद्राचा व्यवसाय करणाऱ्या एका दुकानदार युवकासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. दरम्यान, त्यांच्यात शारीरिक संबंधही झाले, त्यातून ती गर्भवती झाली. मुलीने लग्न करण्याचा तगादा लावला, परंतु आरोपीने लग्नास नकार देऊन तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. २१ जुलैला घरी कुणीच नसताना आरोपीने माझ्या मुलीचा गळा दाबून व मारहाण करून खून केला, असा आरोप मुलीच्या आईने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले असून, ही आत्महत्या की हत्या, हे गूढ अजूनही कायम आहे. पुढील तपास अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, अनिरुद्ध कुंडगिर करीत आहेत.
माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:33 IST