शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय चिकित्सालयाची कोट्यवधींची इमारत धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:35 IST

आरमोरी : शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून आरमोरी येथे तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाची सुसज्ज अशी नवीन इमारत बांधली. येथे ...

आरमोरी : शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून आरमोरी येथे तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाची सुसज्ज अशी नवीन इमारत बांधली. येथे महागड्या नवीन मशिनरी व तपासणी यंत्रही पुरविण्यात आले. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून नवीन इमारतीच्या उद‌्घाटनाचा मुहूर्त न निघाल्याने कोट्यवधींची इमारत व महागड्या मशिनरी ही धूळ खात पडलेल्या आहेत. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने पशू चिकित्सालयाची सेवाही अस्थिपंजर झाली आहे.

पाळीव जनावरांवरील विविध आजारांचे निदान व्हावे, चांगली पशुवैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी आरमोरी येथे १ कोटी ९२ लाख रुपये खर्चून तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाची सुसज्ज नवीन इमारत बांधण्यात आली. इमारतीचे बांधकाम झाल्यावर या इमारतीमध्ये एक्सरे मशीन, सोनोग्राफी मशीन व विविध प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या करण्याकरिता तपासणी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. मात्र मशिनरी व तपासणी यंत्र हाताळणाऱ्या तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे मशिनरी व तपासणी यंत्राचा उपयोग काय? गुरांच्या विविध आजारांचे निदान कसे कळणार, असा प्रश्नही पशुपालकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधीच्या इमारती सोबतच लाखोंच्या मशिनरी धूळ खात पडल्या आहेत. तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा डोलारा एक पशुवैद्यकीय अधिकारी व एका शिपायावर सुरू आहे. इमारत बांधकाम होऊन पाच-सहा वर्षांचा कालावधी उलटला मात्र इमारतीचे लोकार्पण करण्यात आलेले नाही. अनेकदा उद‌्घाटनाचे नियोजन करण्यात आले. मात्र त्यावेळी आलेल्या आचारसंहिता व तांत्रिक कारणांमुळे उद्घाटनाला ब्रेक लागत गेला. त्यामुळे गेल्या पाच-सहा वर्षांपासून सदर प्रशस्त इमारत उद‌्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. कोट्यवधींची इमारत रिकामी पडून असेल तर बांधकाम करण्याची गरज काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र याकडे शासन, प्रशासन व पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

बाॅक्स...

कौलारू इमारतीतून कारभार

आरमोरी लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रात आरमोरी, वघाळा, सायगाव, अरसोडा, शिवनी, रवी, मुलूरचक, पालोरा, शेगाव, आदी गावे येतात. आरमोरी शहर व परिसरातील गावात पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे गुरे व पशुपक्षी आजारी पडल्यास शेतकरी याच पशू चिकित्सालयात उपचारासाठी आणतात. मात्र नवीन इमारत होऊनही आजही पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा कारभार जुन्या लागून असलेल्या कौलारू इमारतीतून चालत आहे.

बाॅक्स

रिक्त पदामुळे सेवा अस्थिपंजर

तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयात पाच पदे मंजूर आहेत ; यापैकी एक पशुधन विकास अधिकारी आणि एक शिपायाचे पद भरण्यात आले आहे. २०१५ पासून येथील सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ लिपिक व वरणोपचाराचे पद रिक्त आहे. याशिवाय नवीन मशीनरी व तपासणी यंत्र हाताळण्यासाठी नव्याने टेक्निशियनची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे पशू चिकित्सालयाच्या सर्व कामांची जबाबदारी एकटे पशुधन विकास अधिकारी डॉ. किशोर पराते यांच्यावर येऊन पडली आहे.

===Photopath===

240421\24gad_5_24042021_30.jpg

===Caption===

आरमाेरी येथील पशुचिकित्सालयाची प्रशस्त नवीन इमारत.