शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

खासदार पोहोचले शेताच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 06:00 IST

खा.नेते यांनी अमिर्झा येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या. परतीच्या अवकाळी पावसामुळे या भागातील धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. धानपीक कापणीला आले असताना आठ दिवस आलेल्या पावसामुळे शेतातील बांध्यामध्ये पाणी साचले. तसेच वादळामुळे धानपीक खाली कोसळले.

ठळक मुद्देअमिर्झा परिसराला भेट : मदतीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तालुक्यातील जेप्रा, दिभना, अमिर्झा, चांभार्डा, टेंभा व मरेगाव परिसरात परतीच्या व अवकाळी पावसामुळे धान पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता खा. अशोक नेते शुक्रवारी भेट दिली. या परिसरातील नुकसानाचे सर्व्हेक्षण करून शासनाकडे अहवाल पाठवाव्या, अशा सूचना त्यांनी तहसीलदार, बीडीओ तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.खा.नेते यांनी अमिर्झा येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या. परतीच्या अवकाळी पावसामुळे या भागातील धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. धानपीक कापणीला आले असताना आठ दिवस आलेल्या पावसामुळे शेतातील बांध्यामध्ये पाणी साचले. तसेच वादळामुळे धानपीक खाली कोसळले. खरीप हंगामात केलेला खर्चसुद्धा भरुन निघणे कठिण असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई तत्काळ कशी मिळेल, यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची माहिती देऊन शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी करणार असल्याचे अशोक नेते यांनी सांगितले. भेटीदरम्यान तहसीलदार महेंद्र गणवीर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, संवर्ग विकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, जिल्हा महामंत्री भारत खटी, प्रशांत वाघरे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, बंडू झाडे, जि.प. सदस्य नीता साखरे व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेते