शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाºयांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:13 IST

पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवा भरतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागातील अव्वल कारकून दर्जाच्या कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय कामकाज प्रभावित : आरमोरी व चामोर्शी, देसाईगंजसह जिल्हाभरात धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवा भरतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागातील अव्वल कारकून दर्जाच्या कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे. अव्वल कारकून अतिरिक्त होऊन त्यांना पदावन्नत व्हावे लागणार आहे. त्यामुळे पदभरतीच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाभरातील कर्मचाºयांनी १० आॅक्टोबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाºयांच्या आंदोलनामुळे तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील दैनंदिन प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले.आरमोरी - पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदे पदोन्नतीचे असल्यामुळे सरळ सेवेने भरण्यात येऊ नये, नायब तहसीलदारांचा नवा ग्रेड पे मान्य करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटना तालुका शाखा आरमोरीच्या वतीने मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान कर्मचारी कार्यालयस्थळी हजर झाले. मात्र त्यांनी कोणतेही प्रशासकीय दैनंदिन कामकाज केले नाही. या आंदोलनात आरमोरीचे नायब तहसीलदार पित्तुलवार, भुरसे, कुकडकर, शेषराव बागमरे, दिलीप जवंजाळकर, राऊत, ढेंगे, राजू धुडसे आदींसह अनेक कर्मचारी सहभागी झाले आहेत.चामोर्शी - महसूल कर्मचारी संघटना तालुका शाखा चामोर्शीच्या वतीने मंगळवारपासून बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे. महसूल कर्मचाºयांनी यावेळी शासन धोरणाविरोधात नारेबाजी केली. या आंदोलनात संघटनेचे तालुका सचिव एस. पी. शिंदे, उपाध्यक्ष एस. डी. बारसिंगे, नायब तहसीलदार एस. के. बावणे, एस. आर. तनगुलवार, जे. के. काझी, अव्वल कारकून के. पी. शेरकी, आर. एम. वैद्य, एस. आर. फुलझेले, एस. आर. बावणे, आर. एस. कुशमवार, डी. आर. पेशट्टीवार, ए. ए. गव्हारे, लिपीक, टंकलेखक, एम. पी. कुळमेथे, एस. ए. ठाकूर, एस. पी. शिंदे, डी.सी. सहारे, बी. ए. उध्दवार, आर. पी. कुळसंगे, एम. डब्ल्यू. मडावी, जे. एम. मडावी, जे. व्ही. कालेश्वरराव, डी. के. लिंगायत, कोडाप, शिपाई एफ. दर्राे, एस. एम. मडावी, पहारेकरी चांदेकर, शिपाई अंजना सोनकुसरे, लिपीक प्रवीण आदे, अमोल गेडाम आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.कुरखेडा, धानोरा, देसाईगंज, भामरागड, अहेरी, मुलचेरा, कोरची आदी तालुक्यातील पुरवठा विभाग व महसूल कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन केले. दरम्यान शेकडो कर्मचाºयांनी कार्यालयाच्या परिसरात धरणे दिले. या आंदोलनामुळे सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना आल्यापावली जावे लागले.