शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

दारू विक्रेत्यांच्या घरासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 5:00 AM

लांजेडा हा शहरातील मोठा वार्ड आहे. या भागात अनेक जण दारूची मोठ्या प्रमाणात विक्री करतात. परिणामी परिसरात सतत पुरुषांचा राबता असतो. अनेक ठिकाणी रस्त्यावरच दारू विकली जाते. रात्रीला तर लोक रोडवरच दारू पितात. याचा त्रास या भागातील लोकांना व खास करून महिलांना व युवतींना होतो. त्यामुळे या भागातील महिलांनी मुक्तिपथच्या सहकार्याने वार्ड संघटन तयार करून दारू विक्रेत्यांना आव्हान दिले.

ठळक मुद्देलांझेडा वार्डात थाली बजाव । दारू विक्रीमुळे वार्डात वाढली गर्दी; कोरोनाचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दारूविक्री बंद होण्यासाठी शहरातील लांजेडा येथील वार्ड क्रमांक ४ मधील महिलांनी दारू विक्रेत्यांच्या घरासमोर शुक्रवारी ताट वाजवून अनोखे प्रतिकात्मक आंदोलन केले. महिलांच्या या गांधीगिरीमुळे विक्रेतेही खजील झाले होते.लांजेडा हा शहरातील मोठा वार्ड आहे. या भागात अनेक जण दारूची मोठ्या प्रमाणात विक्री करतात. परिणामी परिसरात सतत पुरुषांचा राबता असतो. अनेक ठिकाणी रस्त्यावरच दारू विकली जाते. रात्रीला तर लोक रोडवरच दारू पितात. याचा त्रास या भागातील लोकांना व खास करून महिलांना व युवतींना होतो. त्यामुळे या भागातील महिलांनी मुक्तिपथच्या सहकार्याने वार्ड संघटन तयार करून दारू विक्रेत्यांना आव्हान दिले. अनेक अहिंसक कृती करून दारू उद्ध्वस्त केली. मोठी साठे नष्ट केले. काही विक्रेत्यांविरुद्ध गुन्हाही दाखल झाला. काहींना शिक्षा तर अनेकांवर दंडात्मक कारवाई झाली. असे असतानाही दारू विक्रेते दारूविक्री करीतच आहेत.विक्रेत्यांना दारूविक्रीपासून परावृत्त करण्यासाठी शुक्रवारी महिलांनी अनोखे आंदोलन उभारले. विक्रेत्यांना खजील करण्यासाठी दारूविक्रेत्यांविरोधात ठाम उभ्या असलेल्या महिलांनी त्यांच्या घरासमोर जाऊन थाली बजाव आंदोलन केले. सात ते आठ विक्रेत्यांच्या घरासमोर ताट वाजवून माहिलांनी दारू विक्री बंद करण्याची प्रतीकात्मक मागणी केली. दारू विक्रीमुळे लांझेडा वार्डात इतरही धंद्यांना ऊत आला आहे.दारू विक्रेत्यांमुळे वार्डात लोकांची गर्दी होते. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. परिणामी दारूविक्री तात्काळ बंद करण्याची मागणी महिलांनी आंदोलनाच्या माध्यमातून केली. वार्डातील मानकाबाई मेश्राम, शशिकला मडावी, जोत्स्ना कुकुडकर, इंदिरा नैताम, मंदाबाई मडावी, शकुंतला सोमणकर, पुष्पा मेश्राम, वनिता टिकले, पार्वता गेडाम, अल्का नैताम, वंदना नैताम, कासुबाई नैताम, मालाबाई नैताम आणि लता नैताम यांनी आंदोलनात सहभाग घेतला.कारवाईचा इशारादारू विक्रेते करीत असलेली चूक त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी सर्वप्रथम शांततेने थाली बजाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे दारू विक्रेत्यांची समाजात बदनामी झाली. या बदनामीमुळे खजील होऊन दारू विक्रीचा व्यवसाय सोडतील अशी अपेक्षा आहे. मात्र यानंतरही दारू विक्री सुरूच ठेवल्यास पोलिसांमार्फत सदर दारू विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांना तुरूंगाची हवा दाखविली जाईल, असा इशारा महिलांनी दिला.

टॅग्स :Socialसामाजिक