शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

टॉवर लाईनसाठी खोदला पहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

लॉकडाऊनच्या पूर्वी सदर पहाडी पोकलॅन मशीनद्वारे खोदून तेथून काम करण्यात आले. पहाडी खोदण्याचे काम अंतिम टप्यात असताना वन विभागामार्फत पोकलॅन मशीन पकडून काम थांबविण्यात आले. मात्र त्यानंतर सदर मशीन सोडण्यात आल्याचे समजते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या या कृतीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केंद्र सरकारच्या वन अधिनियम १९७२ नुसार पहाडांचे खनन करता येत नाही.

ठळक मुद्देकारवाईची मागणी : पुराडा-बेडगाव वन परिक्षेत्रामधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : टॉवरलाईन जंगलातून जात असताना शासनाच्या परवानगीनेच आवश्यक ठिकाणी वृक्षतोड केली जाते. टॉवर लाईनमध्ये जर पहाड आल्यास लाईनला वळण देऊन ती पुढे नेली जाते. परंतु पुराडा-बेडगाव या दोन्ही वन परीक्षेत्राच्या मधोमध असलेला पहाड लॉकडाऊनपूर्वी खोदून तेथून टॉवरलाईन नेण्यात आली. असे असताना वन विभागाने कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.लॉकडाऊनच्या पूर्वी सदर पहाडी पोकलॅन मशीनद्वारे खोदून तेथून काम करण्यात आले. पहाडी खोदण्याचे काम अंतिम टप्यात असताना वन विभागामार्फत पोकलॅन मशीन पकडून काम थांबविण्यात आले. मात्र त्यानंतर सदर मशीन सोडण्यात आल्याचे समजते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या या कृतीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केंद्र सरकारच्या वन अधिनियम १९७२ नुसार पहाडांचे खनन करता येत नाही. टॉवरलाईन जात असल्यास पहाडाच्या ठिकाणापासून लाईनला वळण दिले जाते. परंतु या नियमाला मूठमाती देत टॉवरलाईनचे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदार व शासकीय यंत्रणेने पहाडाचे खोदकाम केले. वन विभागाच्या दुर्लक्षितपणानेच हे झाल्याचे बोलले जात आहे. पहाड तोडण्याचे काम शेवटच्या टप्प्यात असताना पोकलॅन मशिन ताब्यात घेण्यात आली. परंतु मशीनची सुटकाही केली. सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.परवानगीबाबत संभ्रमावस्था कायमसंबंधित वन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी खोदकामाची परवानगी असल्याचे सांगितले. मात्र त्याबाबतचे पत्र त्यांनी दिले नाही. त्यामुळे या कामाला खरंच परवानगी होती की नाही, याबाबतची संभ्रमावस्था कायम आहे. अनेक विकासात्माक कामांसाठी वनकायद्यावर बोट ठेवून अडवणूक होत असताना या कामासाठी परवानगी कुणी आणि कशी दिली याबद्दल चर्चा सुरू आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग