शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, शेतमजुरांना सर्वाधिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:01 IST

शेतमालाची खरेदी बंद असल्यासारखी आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांजवळचे पैसे संपत आल्याने दैनंदिन गरजा व औषधोपचारावर होणारा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न शेतकरी व शेतमजुरांसमोर निर्माण झाला आहे. शेतीची इतर कामेही करणे बंद झाले आहे. शेतमजुरांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

ठळक मुद्देअर्थसाहाय्य व कर्ज पुरवठ्याची मागणी : कोरोना संकटामुळे ग्रामीण भागातील आर्थिक नियोजन कोलमडले

रत्नाकर बोमिडवार ।लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आले. यात शहराबरोबरच खेडेही भरडल्या जात आहेत. कोरोनाचा फटका उद्योगाला बसला. परंतु ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राला सर्वाधिक फटका बसल्याचे दिसून येत आहे.शेतमालाची खरेदी बंद असल्यासारखी आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांजवळचे पैसे संपत आल्याने दैनंदिन गरजा व औषधोपचारावर होणारा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न शेतकरी व शेतमजुरांसमोर निर्माण झाला आहे. शेतीची इतर कामेही करणे बंद झाले आहे. शेतमजुरांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.चामोर्शी तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. तालुक्यातील शेतकरी खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात पीक घेतले जाते. मात्र आता कोरोनाच्या संचारबंदीने शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. शेतमजुरांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. काम मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत राहावे लागत आहे. एकीकडे मजूर मिळत नाही तर दुसरीकडे काम करता येत नाही, अशा द्विधा अवस्थेत शेतकरी, शेतमजूर सापडल्याने त्यांचे आर्थिक नियोजन ढेपाळले आहे.अनेक ठिकाणी कापणीला आलेले कडधान्य तसेच शेवटचा तोडा असलेल्या कापसाची वेचणी केव्हा होईल, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अशावेळी शासन व स्वयंसेवी संस्था त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. परंतु केवळ जीवनावश्यक वस्तू पुरवून उपयोग नाही तर त्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी प्रयत्न करणे गजेचे आहे. शेतकºयांची कर्जमाफी झाली की नाही, शेतकऱ्यांना तातडीने व पुरेसा कर्जपुरवठा होतो की नाही? शेतकºयाला शेतीपयोगी वस्तू रास्त भावात उपलब्ध होतात की नाही या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.कर्मचारी कोरोनाविरोधात लढत असताना त्यांनी शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे अश्रू पुसणे तितकेच महत्त्वाचे आहे. देशाची अर्थव्यवस्था ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना वेळेवर अर्थ पुरवठा न झाल्यास लॉकडाऊन थांबल्यावर शेतकरी, शेतमजूर आर्थिकदृष्ट्या कोसळून पडल्याशिवाय राहणार नाही.लघु व्यावसायिक व अत्यल्प मानधनावर असणाºयांचे होणार बेहालचामोर्शी, गडचिरोली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात छोटे-मोठे व्यवसाय ठप्प पडले आहेत. तालुक्यासह जिल्हा मुख्यालयी असलेल्या दुकानांमध्ये अत्यल्प मानधनावर बरेच युवक काम करतात. अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी ५० हजार ते १ लाख रुपयांचे भांडवल उभारून छोटे व्यवसाय उभे केले आहेत. कोणी भाड्याची खोली घेऊन, दुकानचाळीत तर कुणी ठेला लावून विविध प्रकारच्या वस्तू विक्रीचे दुकान थाटले आहेत. मात्र कोरोना संचारबंदीने गेल्या १५ ते २० दिवसांपासून किराणा वगळता इतर सर्व दुकाने व व्यवसाय पूर्णत: ठप्प पडले आहेत. डेकोरेशन, फुलवारी व इतर व्यवसाय बंद आहेत. या व्यवसायात काम करणारे मजूर व मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी