शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

अर्ध्याअधिक ई-पासचे अर्ज नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 5:00 AM

२४५४ जणांना पास मंजूर झाली होती, पण त्याचा लाभ घेण्याआधीच पासची वैधता संपल्यामुळे ती पास त्यांच्यासाठी कुचकामी ठरली. केवळ वैद्यकीय उपचार घेण्याच्या कारणासाठी किंवा जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल तरच जिल्ह्याबाहेर जाऊन येण्यासाठी पास मंजूर केली जात आहे. इतर कारणांसाठी पास दिली जात नसल्यामुळे नामंजूर होण्याचे प्रमाण जास्त आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याबाहेरील प्रवास झाला कठीण : आतापर्यंत २८०७ जणांना परवानगी, २८९९ जणांना नकार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तिसऱ्या लॉकडाऊनंतर ग्रिन झोन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अंतर्गत प्रवासी वाहतूक आणि नंतर सर्व दुकाने उघडून व्यवहार सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. परंतू जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी विशिष्ट कारणासाठीच दिली जात असल्यामुळे अनेकांचा हिरमोड होत आहे. आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाने २८०९ लोकांना जिल्ह्याबाहेर जाऊन परत येण्यासाठी ई-पास दिली. २८९९ लोकांना मात्र पास नामंजूर केली. अजून २९ जणांचे अर्ज प्रलंबित आहेत.२४५४ जणांना पास मंजूर झाली होती, पण त्याचा लाभ घेण्याआधीच पासची वैधता संपल्यामुळे ती पास त्यांच्यासाठी कुचकामी ठरली. केवळ वैद्यकीय उपचार घेण्याच्या कारणासाठी किंवा जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल तरच जिल्ह्याबाहेर जाऊन येण्यासाठी पास मंजूर केली जात आहे. इतर कारणांसाठी पास दिली जात नसल्यामुळे नामंजूर होण्याचे प्रमाण जास्त आहे.इतर जिल्ह्यातील किंवा राज्यातील नागरिक गडचिरोली जिल्ह्यात अडकून पडले असल्यास त्यांना येथून जाण्यासाठी वेगळ्या परवानगीची गरज असते. ती परवानगी मिळण्यात अडचणी नाही. परंतू नोकरी, व्यवसायानिमित्त इतर राज्यात किंवा जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना गडचिरोली जिल्ह्यात येण्यासाठी परवानगी घेताना थोड्या अडचणी जात आहेत.विशेष म्हणजे रेड झोनमधून येणाºयांना आता गुरूवारपासून (दि.१४) संस्थात्मक विलगिकरणात (इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईन) राहणे आणि त्यांची स्वॅब टेस्ट करणे जिल्हाधिकाºयांनी आवश्यक केले आहे. ही अट मान्य असेल तरच जिल्ह्यात येण्याची परवानगी दिली जात असल्यामुळे अनेकांसाठी ही बाब अडचणीची ठरत आहे. आम्ही होम क्वॉरंटाईन ठेवतो असे सांगून अनेक जण प्रशासकीय यंत्रणेला गळ घात आहेत.पण होम क्वॉरंटाईन ठेवणे जोखमीचे ठरू शकत असल्यामुळे त्याला परवानगी देण्यास प्रशासन तयार नाही. संस्थात्मक विलगिकरणात असताना चाचणी अहवाल जर निगेटिव्ह आला तर घरी विलगिकरणात राहण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते, असे एका अधिकाºयाने सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात दोन पाळीत ड्युटीसध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांश यंत्रणा कोविड-१९ च्या कामातच गुंतलेली आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांना वेगवेगळ्या जबाबदाºया देण्यात आल्या आहेत. ई-पासेस मंजूर-नामंजूर करण्यापासून तर येणाºया-जाणाºया लोकांसाठी मोफत एसटी बसेस, रेल्वे तिकीटची व्यवस्था करणे, विलगिकरणातील नागरिकांची नोंद आणि इतर अनेक जबाबदाºया सांभाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ६ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री १० अशी दोन पाळीत अधिकारी-कर्मचाºयांची ड्युटी लावण्यात आली आहे.३७ लोकांचा अहवाल बाकीआतापर्यंत कोरोनाच्या संशयित २९६ रुग्णांपैकी २६१ रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यापैकी २२४ जणांची चाचणी निगेटीव्ह आली असून ३७ जणांचा अहवाल येणे बाकी आहे. त्या ३७ लोकांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये निरीक्षणाखाली ठेवले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४४ हजार ९७३ प्रवासी आले आहेत. त्यांच्यापैकी २५ हजार ८६० लोकांनी घरी क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला. सध्या १२ हजार ७३९ नागरिक आपापल्या घरी क्वॉरंटाईन तर ६ हजार ३७४ नागरिक विलगीकरण कक्षात क्वॉरंटाईन आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या