शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

सोमवारपासून कृषी सहायकांचे आंदोलन सुरू

By admin | Updated: June 13, 2017 00:42 IST

३१ मे २०१७ च्या शासन निर्णयान्वये मृद व जलसंधारण विभागाची स्थापना करण्यात आली.

काळ्याफिती लावून केले काम : कृषी विभागातील पदे मृद व जलसंधारण विभागाकडे वळविलीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ३१ मे २०१७ च्या शासन निर्णयान्वये मृद व जलसंधारण विभागाची स्थापना करण्यात आली. मृद संधारण विभागाकरिता कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे निर्देशित करण्यात आली. मात्र कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित झाला नसल्याने या बाबीचा विरोध करीत कृषी सहायक संघटनेच्या वतीने सोमवारपासून जिल्हाभरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीने तयार करण्यात यावा, कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार करताना संघटनेला विश्वासात घेण्यात यावे, कृषी सहायकांमधून कृषी पर्यवेक्षकांची १०० टक्के पदे पदोन्नतीने भरण्यात यावी, कृषीसेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी शिक्षण सेवकाप्रमाणे आश्वाशित प्रगती योजना व इतर लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावा, आंतर संभागीय बदलीबाबतचा प्रस्ताव मंत्रालयस्तरावर प्रलंबित आहे. याबाबत निर्णय घ्यावा, आदी मागण्यांसाठी कृषी सहायक संघटनेतर्फे टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. चामोर्शी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सोमवारी कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून कामकाज केले. या आंदोलनात संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय पत्रे, वर्षा कुमरे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील बुद्धे, कार्याध्यक्ष योगेश बोरकर, उपाध्यक्ष अनुराधा चौधरी, दीपा क्षिरसागर, शशांक उत्तरवार, ज्ञानेश्वर मसराम, मनोहर दुधबावरे, सोमेश्वर क्षिरसागर, शारदा वाळके, एस. आर. गरमळे यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरावर कार्यरत कृषीसहायक मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे आहेत आंदोलनाचे टप्पेमहाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीतर्फे कृषी सहायकांचे टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये १२ ते १४ जूनदरम्यान काळ्याफिती लावून कामकाज करणे, १५ ते १७ जूनदरम्यान कृषी सहायक लेखनीबंद आंदोलन करतील. १९ जून रोजी जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने, २१ ते २६ जून दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण, २७ जूनला विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर धरणे त्यानंतर १ जुलै रोजी कृषी आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. १० जुलैपासून कृषी सहायक बेमूदत कामबंद आंदोलन करणार आहेत.