शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:52 IST

चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे बीएसएनएलचा भ्रमणध्वनी मनोरा आहे. परंतु मागील सहा महिन्यांपासून येथील सेवा विस्कळीत होत आहे. परंतु या समस्येकडे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने परिसरातील ग्राहक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देरेगडी परिसरातील ग्राहक त्रस्त : मागणीकडे बीएसएनएलचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे बीएसएनएलचा भ्रमणध्वनी मनोरा आहे. परंतु मागील सहा महिन्यांपासून येथील सेवा विस्कळीत होत आहे. परंतु या समस्येकडे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने परिसरातील ग्राहक त्रस्त झाले आहेत.रेगडी परिसरात बहुतांश भ्रमणध्वनी ग्राहक बीएसएनएलचे आहेत. ग्राहक नियमित सेवेचा उपयोग करीत आहेत. मागील सहा महिन्यांपासून भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत होत आहे. भ्रमणध्वनीवर बोलताना आपोआप संपर्क तुटणे, अनेकदा संपर्क न होणे, संपर्क झालाच तर आवाज न येणे आदी समस्या आहेत. अनेकदा फोन सुरू असतानाही पैैसे कटतात. परंतु आवाज येत नाही. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक नुकसानीसह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.रेगडी येथे शासकीय, निमशासकीय कार्यालये, पोलीस मदत केंद्र, हायस्कूल, उच्च प्राथमिक शाळा, आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य खासगी प्रतिष्ठाने आहेत. त्यामुळे येथील ग्राहक दररोज बीएसएनएल सेवेचा वापर करतात. परंतु योग्य सेवा मिळत नसल्याने संबंधित विभागाविषयी ग्राहकांमध्ये तीव्र रोष आहे.वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष घालून तत्काळ सेवा सुरळीत करावी, अशी मागणी उपसरपंच रमेश दयालवार, प्रशांत शहा, सुरेश शहा, उमेश मल्लीक यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.ग्रा.पं. ठरावाची दखल नाहीरेगडी ग्राम पंचायतीत ८ नोव्हेंबरला ग्रामसभा पार पडली. या सभेत येथील बीएसएनएलची भ्रमणध्वनी सेवा सुरळीत करण्याबाबत ठराव पारित करण्यात आला. लालसू पावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत भ्रमणध्वनी मनोऱ्याची सेवा सुरळीत करण्याबाबत संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याविषयी चर्चा करण्यात आली. सर्वानुमते ठराव पारित करून संबंधित विभागाला पाठविण्यातही आला. या ठरावाला जवळपास सव्वा महिन्याचा कालावधी उलटला. परंतु अद्यापही कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे परिसरातील ग्राहकांमध्ये बीएसएनएलप्रती तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.