शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांना भेडसावतेय मोबाईल कव्हरेजची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात १ हजार ७७१ अंगणवाड्या, ५१८ मिनी अंगणवाड्या, ८९ नागरी भागातील अंगणवाड्या अशा एकूण २ हजार ३७८ अंगणवाड्या आहेत. या सर्व अंगणवाड्यांना स्मार्ट फोन उपलब्ध करून दिले आहेत. माहिती भरण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाने स्वतंत्र अ‍ॅप तयार केला आहे.

ऑफलाईनवर काम सुरू : २,३३८ अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अडचणलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अंगणवाडीची माहिती ऑनलाईन सादर करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक अंगणवाडीला स्मार्ट फोन उपलब्ध करून दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २३७८ अंगणवाड्या आहेत. या सर्व अंगणवाड्यांना लवकरच स्मार्ट फोन दिला आहे. मात्र अनेक गावांमध्ये कव्हरेज नसल्याने ऑनलाईन माहिती सादर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या गावात अजिबात कव्हरेज नाही, त्या ठिकाणी मोबाईलने माहिती पाठविण्याचे काम ठप्प आहे.गडचिरोली जिल्ह्यात १ हजार ७७१ अंगणवाड्या, ५१८ मिनी अंगणवाड्या, ८९ नागरी भागातील अंगणवाड्या अशा एकूण २ हजार ३७८ अंगणवाड्या आहेत. या सर्व अंगणवाड्यांना स्मार्ट फोन उपलब्ध करून दिले आहेत. माहिती भरण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाने स्वतंत्र अ‍ॅप तयार केला आहे.लसीकरण, गृहभेट याबाबतचा दरदिवशीचा रिपोर्ट व इतर माहिती या ठिकाणी भरावी लागते. वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना एका क्लिकवर माहिती उपलब्ध होते. मोबाईलचा खर्च म्हणून प्रत्येकी तीन महिन्याला ४०० रूपये अनुदान दिले जात आहे.अंगणवाडीला स्मार्ट करण्यासाठी शासनाने घेतला निर्णय योग्य आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात मोबाईल कव्हरेजची समस्या अतिशय गंभीर आहे. जिल्ह्याचा ७८ टक्के भाग जंगलाने व्यापला आहे. लोकसंख्या विरळ असल्याने ग्राहकांची संख्या कमी आहे. त्यामुळे खासगी कंपन्या मोबाईल सेवा देण्यास तयार होत नाही. खासगी कंपन्यांचे टॉवर केवळ शहरी भागात आहेत. ग्रामीण भागात काही प्रमाणात बीएसएनएलने टॉवर उभे केले आहेत. मात्र सध्या बीएसएनएलचीही आर्थिक स्थिती नाजूक असल्याने अनेक ठिकाणचे टॉवर बंद आहेत. त्यामुळे कव्हरेज मिळण्यास कठीण होत आहे. परिणामी अंगणवाडी कर्मचारी आॅनलाईन माहिती सादर न करता आॅफलाईनवरच काम सुरू आहे.रिचार्जचा खर्च वाढलामोबाईलच्या डेटावर होणाºया खर्चासाठी तीन महिन्याला ४०० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. मात्र आता मोबाईल कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढविले आहेत. त्यानुसार शासन वाढीव अनुदान देणार काय, असा प्रश्न आहे.

टॅग्स :Schoolशाळा