शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

उद्योगक्रांतीच्या सोंगातून दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:15 IST

मेक इन इंडिया असो की, मेक इन गडचिरोली गेल्या तीन वर्षात सरकार नवीन काहीही करू शकलेले नाही.

ठळक मुद्देकाँग्रेसचा आरोप : जिल्ह्यात नवीन काम दाखवा अन् बक्षीस मिळवा

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : मेक इन इंडिया असो की, मेक इन गडचिरोली गेल्या तीन वर्षात सरकार नवीन काहीही करू शकलेले नाही. आता उद्योग क्रांती यात्रेचे सोंग घेऊन गडचिरोलीचे आमदार नागरिकांची दिशाभूल करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी केला. या यात्रेतून ते काय साध्य करीत आहे ते त्यांनाच माहीत, प्रत्यक्षात ही उद्योग यात्रा आहे की वसुली उद्योग यात्रा? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.सरकारने वाढवून ठेवलेली महागाई आणि निष्क्रीय कारभाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेस करणार असलेल्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी डॉ.उसेंडी यांनी सोमवारी पत्रपरिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, स्थानिक आमदार १०० दिवसात १०० उद्योग उभारणार होते. जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा किती उद्योग उभारले याचा हिशेब त्यांनी द्यावा. जिल्ह्यात या सरकारच्या काळात झालेले एकही नवीन काम दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे आव्हानच त्यांनी राज्य शासनाच्या लोकप्रतिनिधींना उद्देशून दिले.वास्तविक पाहता आमच्या कार्यकाळात सुरू झालेले उद्योगही टिकवणे त्यांना कठीण जात आहे. मुद्रा योजनेतून बेरोजगारांना उद्योगासाठी कर्ज दिले जात नाही. दुष्काळग्रस्त शेतकºयांचे चुकीचे पंचनामे करून त्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले. मोठ्या प्रमाणात कीडीने पिकांचे नुकसान झाले असताना पीक विमा योजनेचा लाभ दिला नाही. ही योजना शेतकºयांसाठी आहे की विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी? असा सवाल उसेंडी यांनी केला. जनधनच्या नावावर सर्वांचे बँक खाते उघडले. पण खात्यात कमी पैसे ठेवले तर खातेधारकाला नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. गोरगरीबांचे कष्टाचे पैसे कपात करून शासनाची तिजोरी भरण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. ज्या राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर कधी तिरंगा फडकविला नाही ते लोक आता तिरंगा यात्रा काढत आहे. आपले अपयश झाकण्यासाठी सरकार विविध क्लुप्त्या लढवत आहेत, असाही आरोप यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी केला. पत्रपरिषदेला काँग्रेसचे पदाधिकारी हसनअली गिलाणी, महेंद्र ब्राम्हणवाडे, सतीश विधाते, पंकज गुड्डेवार, रजनिकांत मोटघरे, पी.टी.मसराम, शंकर सालोडकर, कुणाल पेंदोरकर व इतर उपस्थित होते.महागाईविरोधात उद्या सायकल रॅलीज्यावर पेट्रोलचे दर ठरतात त्या कच्च्या तेलाच्या किमती २०१४ च्या तुलनेत निम्म्याने कमी झाल्या आहेत. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर निम्मे होण्याऐवजी पेट्रोल ६७ रुपयांवरून ८१ रुपये करण्यात आले. यामुळे इतर वस्तूंच्याही किमती वाढल्या आहेत. गॅस ८१० रुपयांना घ्यावा लागत आहे. ही सामान्य नागरिकांची लूट आहे. या किमती कमी करण्यासाठी आणि शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी ३१ जानेवारीला जिल्हा मुख्यालयासह तालुकास्तरावर काँग्रेसकडून सायकल रॅली काढली जाणार असल्याचे डॉ.उसेंडी यांनी सांगितले.