भाडभिडी हद्दीतील कालिदास उष्टू गेडाम यांच्या सर्व्हे नंबर २४६, २.२० हे. आर. जागेपैकी केवळ ०.८० हे. आर. जागेतून जून महिन्यापर्यंत २ हजार २२५ ब्रासच मुरूम काढण्याचीच परवानगी दिली होती. समोरच्या जागेचा खोदकामाचा परवाना नव्हता; परंतु जून महिन्यात अधिकचे मुरूम खनन करण्यात आले. तसेच जुलै महिन्यात नाममात्र परवानगी घेऊन शेतातून हजारो ब्रास मुरूम काढला आहे. ज्या जागेतून मुरूम काढण्याची परवानगी घेतली होती, त्या जागेपेक्षा पूर्णच २.२० हे. आर. जागेमधून हजारो ब्रास मुरूम खोदण्यात आला. परवानगी नसलेल्या जागेवरून मुरूमाचे खनन कसे काय करण्यात आले, असा प्रश्न आहे. पाऊस बंद असलेल्या दिवशी सुरळीत मुरूम खनन सुरू आहे. अशाप्रकारचा अवैध प्रकार सुरू असतानाही महसूल अधिकारी किंवा कर्मचारी कारवाई करताना दिसत नाहीत. तळोधी माेकासा येथे तलाठी कार्यालय आहे. दररोज येथून मुरुमाचे ट्रक जात असतात. परंतु त्यांची चाैकशी किंवा परवाना तपासणी केली जात नाही.
जून महिन्यातील खोदकामाची प्रत्यक्ष चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबतचे पत्र एसडीओंनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले हाेते. याबाबत त्यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशीही पत्रव्यवहार केला हाेता. परंतु माेक्यावर काेणत्याही अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. एसडीओंनी मुरूमाचे ट्रक पकडून दंड ठाेठावला हाेता. तरीसुद्धा मुरूमाचे खनन व वाहतूक सुरूच आहे. विशेष म्हणजे, अधिकारी येणार असल्याचे कळल्यावर तात्पुरते काम बंद ठेवण्यात येते. त्यामुळे उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बाॅक्स
एसडीओ म्हणतात, ५०० ब्रासचीच परवानगी
भाडभिडी येथील मुरूम खननाबाबत विचारणा केली असता, मुरूम खननासाठी जून महिन्यातच परवानगी दिली हाेती. जुलै महिन्यात आपल्या कार्यालयाकडून परवानगी दिली नाही. जर तेथे अधिकचे मुरूम खनन झाले असेल, तर शेतकऱ्यांनी याबाबत माहिती देणे आवश्यक हाेते. तेव्हाच कारवाई केली असती. यापूर्वी मुरूम भरलेल्या हायवा ट्रकवर तीनवेळा कारवाई करून ७ लाखांचा दंड ठाेठावला आहे. तहसीलदारांनी जुलै महिन्यासाठी ५०० ब्रास मुरूम खननाची परवानगी दिली आहे. काम करणारी राष्ट्रीय कंपनी असल्याने आपण कारवाई करू शकत नाही, असे सांगितले.
300721\img_20210717_105315.jpg
परवण्याव्यतिरिक्त मुरूम खोदकाम सुरू अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष