शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

मार्र्कं ड्यात उसळला लाखोंचा जनसागर

By admin | Updated: February 18, 2015 01:20 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथील श्री मार्र्कंडेश्वराच्या यात्रेस १७ फेब्रुवारी मंगळवारपासून महाशिवरात्रीनिमित्त यात्रेला प्रारंभ झाला आहे.

गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथील श्री मार्र्कंडेश्वराच्या यात्रेस १७ फेब्रुवारी मंगळवारपासून महाशिवरात्रीनिमित्त यात्रेला प्रारंभ झाला आहे. यात्रेनिमित्त मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी व पूजनासाठी मंगळवारी पहिल्याच दिवशी विदर्भासह लगतच्या आंध्रप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक दाखल झाले. यात्रेनिमित्त मार्र्कंडा येथे लाखो शिवभक्तांचा जनसागर उसळला. राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटेच्या सुमारास श्री मार्र्कंडेश्वराची महापूजा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासह पंकज पांडे, शुभांगी पांडे, राजमाता राणी रूख्मिणीदेवी, कुमार अवधेशरावबाबा, प्रवीणबाबा, सचिन पेदापल्लीवार यांनी मुख्य गाभाऱ्यातील शिवलिंगाची महापूजा केली. यावेळी भक्तामधील पहिले वारकरी म्हणून चंद्रपूर येथील राजू कृष्णापूरकर यांचा मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नाना आमगावकर महाराज, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामू तिवाडे, कोषाध्यक्ष पां. गो. पांडे, रामप्रसाद धर्मशाळेचे अध्यक्ष गंगाधर कोंडुकवार, उपाध्यक्ष किसन गिरडकर, सचिव केशव आंबटवार, जि.प.चे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, मनोहर पालारपवार, पंकज पालारपवार, आबाजी धोडरे, संजय वडेट्टीवार, अनिल चिंतलवार, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, वन परिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार, विस्तार अधिकारी पी. डी. भोगे, मुद्देमवार, विनायक नरखेडकर, रणदिवे, प्रशांत शेंडे, सहायक अभियंता डी. बी. कुंभारे, तहसीलदार अशोक कुंभरे, उज्वल गायकवाड आदी उपस्थित होते. यात्रेनिमित्त मार्र्कंडेश्वर देवस्थानात मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास महापुजेला सुरूवात झाली. त्यानंतर रांगेमध्ये लागलेल्या शिवभक्तांनी सकाळी ६ वाजता पासून पूजन करून व दर्शन घेण्यास प्रारंभ केला.अशी आहे व्यवस्थायात्रेदरम्यान प्रशासनाच्यावतीने नदीपात्रात जीव रक्षक बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याबरोबरच अग्निशामक दल, विशेष कृती दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने चोवीस तास आरोग्य सेवा देण्याची व्यवस्था केली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी १२ ठिकाणी नळाची व्यवस्था केली आहे. सदर यात्रेच्या व्यवस्थापनावर तहसीलदारांसह इतर सर्व विभागांचे लक्ष आहे.स्वच्छतेची जबाबदारी कुणाची?महाशिवरात्रीनिमित्त यात्रेत १० लाखांवर भाविक सर्व भागातून येतात. यात्रेनिमित्त अनेक व्यावसायिक दुकाने थाटतात व यात्रा संपल्यानंतर निघून जातात. शिवलिंगावर वाहलेले पूजेचे साहित्य, फोडलेल्या नारळांच्या करवत्याचा कचरा पडून राहतो. यात्रेसाठी व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली आहे. प्रशासनही दक्ष आहे. मात्र यात्रेनंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत नसल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे.वांगेपल्ली नदी घाटावर शिवभक्तांची गर्दीवांगेपल्ली : अहेरी तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या वांगेपल्ली गावालगत प्राणहिता नदी घाटावर महाशिवरात्रीनिमित्त सुरू झालेल्या यात्रेत येथील शिवमंदिरात शिवभक्तांची अलोट गर्दी उसळली. नदीच्या पात्रात स्नान करून अनेक शिवभक्तांनी महादेवाचे दर्शन घेतले. सदर मंदिर पुरातन असल्यामुळे नजीकच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातून भाविक दाखल झाले आहेत. महसूल विभागाच्या वतीने या ठिकाणी नौका चालविण्यासाठी प्रशिक्षीत नावाड्याची व्यवस्था करण्यात आली असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आली आहे. अहेरी जिल्हा कृती समितीच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.