शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आहार पुरवठ्यात लाखोंचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:45 IST

जिल्ह्यात शालेय पोषण आहारात सध्या महिन्याकाठी लाखो रुपयांचा अपहार होत असून त्यात संबंधित यंत्रणा आणि आहार पुरवठादार यांची साठगाठ असल्याचा आरोप ज्येष्ठ जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम यांनी पत्रपरिषदेत केला.

ठळक मुद्देजि.प.सदस्य राम मेश्राम यांचा आरोप

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्यात शालेय पोषण आहारात सध्या महिन्याकाठी लाखो रुपयांचा अपहार होत असून त्यात संबंधित यंत्रणा आणि आहार पुरवठादार यांची साठगाठ असल्याचा आरोप ज्येष्ठ जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम यांनी पत्रपरिषदेत केला.शालेय पोषण आहाराचा कंत्राट जानेवारी महिन्यात कन्झुमर फेडरेशन मुंबईला मिळाला, मात्र प्रत्यक्षात त्यांनी आहार पुरवठ्याची जबाबदारी दुसऱ्यांलाच दिली आहे. त्यामुळे तांदूळ पुरवठ्यात कमी वजनाच्या बॅग शाळांना पुरविल्या जात आहेत. यासंदर्भातील तक्रारी आल्यानंतर स्वत: काही शाळांना भेटी देऊन तेथील पोषण आहाराच्या सीलबंद कट्ट्यांचे वजन केले असताना ते निर्धारित वजनापेक्षा कमी आढळल्याचे अ‍ॅड.मेश्राम यांनी सांगितले.दि.९ फेब्रुवारीला हिरापूर येथील उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. त्या ठिकाणी २ फेब्रुवारीला पोषण आहारातील तांदळाच्या कट्ट्यांचा पुरवठा झाला होता. त्यातील न वापरलेल्या तांदळाच्या सीलबंद कट्ट्यांचे वजन केले असता प्रत्येक कट्ट्यात दिड ते दोन किलो तांदूळ कमी आढळून आला. यावेळी हिरापूरचे उपसरपंच दिवाकर निसार, मुख्याध्यापक बी.एन.नवघडे व इतर लोकांसमक्ष पंचनामा केल्याचे मेश्राम यांनी सांगितले. त्याचबरोबर दि.१५ ला पोटेगाव येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेला भेट देऊन पोषण आहाराची पाहणी केली असता तिथे ११ तांदळाच्या ५० किलोच्या कट्ट्यांमध्ये प्रत्येकी ५ किलो तांदूळ कमी आढळून आला. याशिवाय खाण्याचे तेल १ लिटरचे देऊन पावती मात्र १ किलोची देण्यात आली. त्यात एका पाकिटात ९० ग्रॅम तेल कमी होते. याशिवाय वटाणा, तूर दाळ यांचेही वजन कमी आढळले असून तिथेही गडचिरोली पं.स.चे उपसभापती विलास दशमुखे, मुख्याध्यापक बगमारे व इतर लोकांसमक्ष पंचनामा करण्यात आला. एफसीआयच्या पोत्यांना मध्येच छिद्र पाडून तांदूळ काढला जातो. केवळ एका तालुक्याला महिन्याला ६६ हजार किलो तांदळाचा पुरवठा होतो. त्यात ६ हजार किलो तांदूळ कमी भरल्या गेला तरी महिन्याकाठी ५० लाखांचा अपहार होत असल्याचे अ‍ॅड.मेश्राम म्हणाले.कृषी महोत्सवाला जि.प.सदस्यांचे वावडेगडचिरोलीत आयोजित कृषी व गोंडवाना महोत्सवाचे आयोजन आत्मा आणि डीआरडीएकडून केले जात आहे. मात्र जिल्हा परिषदेशी संबंधित विभाग असतानाही जि.प.उपाध्यक्ष, सभापती किंवा सदस्यांना निमंत्रण पत्रिकेत स्थान दिले नाही. जिल्हा परिषद ही भाजपची प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी झाली का? असा सवाल करून याची चौकशी करावी अशी मागणी अ‍ॅड.राम मेश्राम यांनी केली.