शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
3
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
4
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
5
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
6
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
7
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
8
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
9
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
10
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
11
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
12
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
13
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
14
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
15
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
16
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
17
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
18
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
19
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
20
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर

धान भरडाईच्या नियोजनासाठी मिलर्स असोसिएशनची मुंबईत धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या अतिरिक्त तांदळाचा पुरवठा राज्यातील अनेक जिल्ह्यांना दरवर्षी केला जातो. परंतू यावर्षी उशिराने आणि केवळ दोनच जिल्ह्यांना तांदूळ पुरवठ्याची जबाबदारी गडचिरोलीवर टाकण्यात आली. परिणामी गोदामे आणि खरेदी केंद्रांवरील धान अजूनही भरडाईच्या प्रतीक्षेत आहे. यावर्षीच्या हंगामात धान भरडाईसाठी जिल्ह्यातील ६५ राईस मिलर्सनी करारनामा केला आहे.

ठळक मुद्देअर्धेअधिक खरेदी केंद्र बंदच : तांदळाची उचल करण्यासाठी अन्य जिल्हे जोडण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील तांदळाची उचल करण्यासाठी आतापर्यंत केवळ औरंगाबाद आणि सोलापूर या दोनच जिल्ह्यांना जोडण्यात आल्यामुळे अजूनही धान भरडाईच्या कामाला वेग आला नाही. परिणामी अर्धेअधिक धान खरेदी केंद्र बंदच आहे. यावर तोडगा काढून भरडाईसाठी योग्य नियोजन करण्याच्या मागणीसाठी गडचिरोली जिल्हा सीएमआर मिलर्स असोसिएशनने मुंबईत धाव घेतली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून अन्न व नागरी पुरवठामंत्र्यांचीही भेट घेतली. त्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटण्याची चिन्हे बळावली आहेत.गडचिरोली जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या अतिरिक्त तांदळाचा पुरवठा राज्यातील अनेक जिल्ह्यांना दरवर्षी केला जातो. परंतू यावर्षी उशिराने आणि केवळ दोनच जिल्ह्यांना तांदूळ पुरवठ्याची जबाबदारी गडचिरोलीवर टाकण्यात आली. परिणामी गोदामे आणि खरेदी केंद्रांवरील धान अजूनही भरडाईच्या प्रतीक्षेत आहे. यावर्षीच्या हंगामात धान भरडाईसाठी जिल्ह्यातील ६५ राईस मिलर्सनी करारनामा केला आहे. परंतू जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून पोषणयुक्त (फोर्टिफाईड) तांदूळ पुरवठा करायचा म्हणून केवळ ११ मिलर्सचे करारनामे करून नियतन देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत खरेदी केलेल्या धानापैकी फक्त १४ टक्के धानाची भरडाई होऊ शकली.या सर्व अडचणींंमुळे शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी रखडली आहे. ही बाब देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आकाश अग्रवाल, पुरूषोत्तम डेंगानी, अशोक चांडक आदींनी विधानसभाध्यक्ष नाना पटोले व ना.छगन यांना पटवून दिल्यानंतर त्यांनी इतर जिल्ह्यांच्या पुरवठ्याची आॅर्डर लवकरच देऊन ही समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.