शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

मार्कंड्यात लाखो शिवभक्तांचा कुंभमेळा

By admin | Updated: March 8, 2016 01:19 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथील श्री मार्कंडेश्वराच्या यात्रेस ७ मार्चर् सोमवारपासून

मार्कंडा : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथील श्री मार्कंडेश्वराच्या यात्रेस ७ मार्चर् सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. यात्रेनिमित्त मार्र्कंडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी व पूजन करण्यासाठी यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवारी विदर्भासह लगतच्या आंध्रप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक दाखल झाले. यात्रेनिमित्त मार्कंडा येथे लाखो शिवभक्तांचा जनसागर उसळला. यंदा पहिल्यांदाच पहिल्याच दिवशी दोन लाख भाविकांनी मार्कंडा यात्रेला हजेरी लावून मार्कंडेश्वराचे दर्शन घेतले.राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते जत्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे ५ वाजताच्या सुमारास श्री मार्र्कंडेश्वराची महापूजा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासह पंकज पांडे, शुभांगी पांडे, राजमाता राणी रूक्मिणीदेवी, कुमार अवधेशरावबाबा, मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्युंजय गायकवाड, सहसचिव रामू तिवाडे, कोषाध्यक्ष पा. गो. पांडे, अहेरीचे नगरसेवक अमोल मुक्कावार, रामप्रसाद धर्मशाळेचे सचिव केशव आंबटवार, पोलीस निरिक्षक किरण अवचर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांनीही मार्र्कंडेश्वराच्या मुख्य गाभाऱ्यात शिवलिंगाची पूजा केली. यावेळी रवींद्र ओल्लालवार, किशोर ओल्लालवार, उज्वल गायकवाड, प्रा. राजेश कात्रटवार, डॉ. भारत खटी, तहसीलदार उमाकांत वैद्य, बीडीओ बादलशहा मडावी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, आनंद गण्यारपवार, नगरसेवक गिरीष मद्देर्लावार, रोषनी वरघंटे, स्वप्नील वरघंटे आदी उपस्थित होते.दुपारी ११ वाजताच्या सुमारास केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही मार्र्कंडेश्वराचे दर्शन घेतले. त्यांच्या समावेत आमदार देवराव होळी हजर होते. यावेळी मार्र्कंडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने गंगाधर कोंडुकवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन ना. अहीर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार सचिव मृत्यूंजय गायकवाड, रामू तिवाडे, उज्वल गायकवाड आदी उपस्थित होते. सोमवारला मार्र्कंडेश्वराच्या मुख्य मंदिरापासून एक किमी अंतरापर्यंत भाविकांची प्रचंड रांग लागली होती. हर हर महादेवच्या घोषणेने मार्र्कंडा नगरी दुमदुमली.वैनगंगेच्या तीरावरही जीवरक्षक तैनात४यात्रेदरम्यान प्रशासनाच्या वतीने नदी पात्रात जीवरक्षक बोटीची व्यवस्था करण्यात आली असून पाच जणांचा समावेश असलेली बचाव टीमही तैनात करण्यात आली आहे. यासोबतच अग्नीशामक दल, विशेष कृती दलाची पथके तैनात करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने येथे २४ तास आरोग्य सेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी १५ ठिकाणी नळाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष महिला पोलीस पथक तैनात करण्यात आले असून सदर पथक यात्रेवर २४ तास नजर ठेवून आहे.ग्रा.पं.तर्फे अशी आहे व्यवस्था४मार्र्कंडादेव ग्रामपंचायतीच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात चेंचींग रूम, सुलभ शौचालय, २० मूत्रीघर व विद्युतीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिनेश सराटे यांच्या पुढाकारातून यात्रेकरूंसाठी २४ तास पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते लौकीक भिवापुरे, चामोर्शीचे नगरसेवक वैभव भिवापुरे यांच्या मार्फत पॉकेटबंद पाण्याची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली आहे.