शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

धानावर लष्करी अळीचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 23:42 IST

वातावरणात झालेल्या बदलामुळे धान पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यामुळे धानाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी या किडीच्या नियंत्रणासाठी योग्य नियोजन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवातावरणातील बदलाचा परिणाम : वेळीच फवारणी करून किडीचा प्रादुर्भाव रोखण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वातावरणात झालेल्या बदलामुळे धान पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यामुळे धानाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी या किडीच्या नियंत्रणासाठी योग्य नियोजन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे.लष्करी अळी पिकावर लष्कराप्रमाणे हल्ला करून शेत फस्त करते. या किडीचा आकार एक ते दोन सेमी लांब असतो. समोरील पंख गडद पिंगट असतात व कडेवर नागमोडी पट्टे असतात. या अळ्या रात्री कार्यक्षम राहतात. दिवसा धानाच्या बेचक्यात व बांधावरील गवतामध्ये लपून बसतात. या अळ्या पाने कडेकडून कुरतडतात. चार ते पाच अळ्या प्रती चौरस मीटर क्षेत्रातील शेत फस्त करतात. त्यामुळे शेत धानाचे पीक निष्पर्न होते. पीक लोंबी अवस्थेत असताना या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास धानाच्या लोंब्या कुरतडल्यामुळे शेतात लोबांचा सडा पडलेला आढळतो. लष्करी अळ्यांचा व्यवस्थापनासाठी शेताचे बांध स्वच्छ ठेवावे. चुडात किंवा जमिनीवर निघणाºया अळ्या गोळा करून त्या नष्ट कराव्या. धानाच्या बांधीत दोन ते तीन इंचापर्यंत पाणी साठवून ठेवावे. पिकावरून दोन किंवा झाडाच्या फांद्या फिरवून लष्करी अळ्या पाडाव्यात त्या वेचून नष्ट कराव्यात. बेडकांचे संरक्षण करावे, कारण बेडूक अळ्या खातात. लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास तिच्या नियंत्रणाकरिता डायक्लोरोवास ७६ टक्के ईसी, १२ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करताना कीटकनाशकांचे प्रमाण योग्य घेऊन सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत फवारणी करावी. फवारणी करताना योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक संदीप कºहाळे, विषय विशेषज्ज्ञ पुष्पक बोथीकर यांनी केले आहे.सोयाबिन पिकावर चक्रभुंगा ही किडी आढळून येते. या किडीची मादी भुंगा पानाच्या देठावर फांदीवर किंवा मुख्य खोडावर साधारणपणे एकमेकांपासून १ ते १.५ सेमी अंतरावर समांतर गोल काप तयार करून त्यामध्ये अंडी टाकते. त्यामुळे चक्रतापाचा वरचा भाग सुकतो. अंड्यातून निघालेली अळी पानाचे देठ किंवा फांदीतून आत जाते. मुख्य खोडाचा भाग पोखरते. या किडीचा प्रादुर्भाव सोयाबिनसोबतच मुग, उडीद, चवळी या पिकांवर होऊ शकतो. या किडीच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनाफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोट्रॅनिलीप्रोल १८.५० टक्के प्रवाही ३ मिली किंवा इथेनॉल ५० टक्के प्रवाही फवारावे.कापसावरील रस शोषक किडीचे व्यवस्थापनअगदी सुरूवातीच्या काळापासून कापूस पिकावर मावा, तुडतुडे, फूलकिडे या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या पाहणीत या किडीचा प्रादुर्भाव कापूस पिकावर दिसून आला आहे. या किडींच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील फांद्या, पाने व इतर पालापाचोळा जमा करून किडीसहीत नष्ट करावा. आंतर मशागत करून तन नष्ट करावे. बांधावर आंबाडी, रानभेंडी ही रसशोषक किडीचे पर्यायी खाद्य आहे, त्यामुळे प्राधान्याने नष्ट करावे. नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्काचे फवारणी करावे किंवा एझाडीरेक्टीन ०.०३ टक्के, निंबोळी तेल आधारीत डब्ल्यूएसपी ३०.०० मिली किंवा अ‍ॅझाडीरेक्टीन ५.००, २० मिली यांची फवारणी १० लिटर पाण्यात मिसळून करावे. प्रत्येक फवारणीला एकचएक कीटकनाशक न वापरता आळीपाळीने त्यांचा वापर करावा. बुप्रोफेजीन २५ टक्के प्रवाही २० मिली, डायफॅक्युरॉन २५ टक्के फवारणी करावी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती