लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : आकांक्षित जिल्हा अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सुक्ष्म सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) येथील १२७ हेक्टरवर सामुहिक सुक्ष्म सिंचन प्रकल्प उभारला जाणार आहे. याचा ९१ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. याचे उद्घाटन जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, समाजसेवक देवाजी तोफा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती गिरळकर, कृषी विकास अधिकारी कोळप, तहसीलदार गणवीर, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. बोथीकर, तालुका कृषी अधिकारी बडवाईक, गणेश गावंडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयंत टेंभुर्णे, कृषी पर्यवेक्षक पानसे, पाठक, भाकरे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने जैन समुहाच्या दृष्टीने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. धान, भाजीपाला, बागायतीच्या क्षेत्रात सुक्ष्म सिंचन हा प्रभावी उपाय आहे. त्या अनुषंगाने लेखा मेंढाचा प्रकल्प जिल्ह्यासाठी पथदर्शी ठरले, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. शेतीसोबतच वन संपदेचा विचार करूनच विकासाची दिशा ठरवावी, असे मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले. गावाला कुशल नेतृत्व असल्याशिवाय व त्या नेतृत्वावर ग्रामस्थांचा सार्थ विश्वास असल्याशिवाय ग्रामोध्दार होऊ शकत नाही, असे विचार डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले. उत्पादित होणार शेतमाल व भाजीपाला शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह, पोलीस कॅम्प यांच्याशी सांगड घालून विक्री करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी केले. देवाजी तोफा यांनी शासनाच्या योजनेत जनतेच्या सहभागापेक्षा जनतेच्या उपक्रमात शासनाचा सहभाग या तत्वानुसार योजना राबविल्यास त्या फलद्रुप होतील, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले. लेखा मेंढा गावात विविध उपक्रम गटशेतीच्या माध्यमातून राबविले जातील. अश्वगंधा, शेवगा या पिकांची लागवड केली जाईल, असे प्रतिपादन हिरळकर केले.
सव्वाशे हेक्टरवर होणार सुक्ष्म सिंचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:16 IST
आकांक्षित जिल्हा अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सुक्ष्म सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) येथील १२७ हेक्टरवर सामुहिक सुक्ष्म सिंचन प्रकल्प उभारला जाणार आहे. याचा ९१ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
सव्वाशे हेक्टरवर होणार सुक्ष्म सिंचन
ठळक मुद्देमेंढा (लेखा) येथे शुभारंभ : आकांक्षित जिल्हाअंतर्गत उपक्रम