शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ध्यानातून मानसिक स्वास्थ्य लाभते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:59 IST

ध्यान केल्यामुळे माणसाला शारीरिक व मानसिक स्वास्थ लाभते. शिवाय जीवनात आनंद व शांतीचा अनुभव येतो. त्यामुळे प्रत्येकाने ध्यान व प्रार्थना नियमितपणे करून आपले जीवन निरोगी करावे,......

ठळक मुद्देकुलगुरूंचे प्रतिपादन : साई मंदिरातील शिबिराचा अनेकांनी घेतला लाभ

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : ध्यान केल्यामुळे माणसाला शारीरिक व मानसिक स्वास्थ लाभते. शिवाय जीवनात आनंद व शांतीचा अनुभव येतो. त्यामुळे प्रत्येकाने ध्यान व प्रार्थना नियमितपणे करून आपले जीवन निरोगी करावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले.श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून रेडीगोडाऊन जवळील साई मंदिराच्या प्रांगणात तीन दिवशीय नि:शुल्क सहज ध्यान साधना शिबिर हार्टफुलनेस तर्फे नुकतेच पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. भुसारी, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर आकोजवार, प्रशिक्षक प्राचार्य लता पार्लेवार, उमेश पटेल, कार्यक्रमाचे आयोजक चंद्रशेखर भडांगे, प्रकाश ताकसांडे, शंकर मुस्कुटे, विनायक उईके आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. सुधीर आकोजवार म्हणाले, धकाधकीच्या जीवन पध्दतीमुळे मानवी जीवन बदलत चालले आहे. पर्यावरण व निसर्गाच्या असंतुलामुळे माणसाच्या शारीरिक व मानसिक स्वास्थावर दुष्परिणाम झाले आहे. हे दुष्परिणाम नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने नियमित ध्यान करणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा प्रकारचे शिबिर होणे गरजेचे आहे, असे सांगितले.प्राचार्य लता पार्लेवार व उमेश पटेल यांनी शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना ध्यान साधनेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रास्ताविक चंद्रशेखर भडांगे यांनी केले तर संचालन व आभार प्रकाश ताकसांडे यांनी मानले. सदर शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला.