शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नक्षल बंदला झुगारून नागरिकांनी उभारले स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:36 IST

पोलीस-नक्षल चकमकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नक्षली ठार होण्याच्या घटनेचा निषेध म्हणून गुरूवारी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदला काही ठिकाणी गावकऱ्यांनी उघड विरोध केला. यावेळी त्यांनी लावलेले बॅनरही जाळले.

ठळक मुद्दे२०१२ मध्ये झाली होती हत्या : गावकऱ्यांनी पुढाकार घेत मोकळा केला अडविलेला रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोलीस-नक्षल चकमकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नक्षली ठार होण्याच्या घटनेचा निषेध म्हणून गुरूवारी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदला काही ठिकाणी गावकऱ्यांनी उघड विरोध केला. यावेळी त्यांनी लावलेले बॅनरही जाळले. एवढेच नाही तर २०१२ मध्ये नक्षल्यांकडून हत्या झालेल्या गजानन मडावी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गावात स्मारकही उभारण्यात आले.नक्षलवाद्यांनी २०१२ साली जारावंडी येथील गजानन मडावी यांची निर्घृण हत्या केली होती. नक्षल बंदचे निमित्त साधत गावकऱ्यांनी मडावी यांच्या स्मरणार्थ व नक्षलवाद्यांच्या निषेधार्थ एकत्र येत गावात त्यांचे स्मारक उभे केले. गावकरी नक्षलवाद्यांच्या राक्षसीपणाला कंटाळले असून त्यांची आता आमच्याशी गाठ आहे, अशा आशयाची कविता एका आदिवासी युवकाने सादर करून आदिवासींच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी लावलेल्या बॅनर्सची वेगवेगळ्या ठिकाणी गावकऱ्यांनी एकत्र येत होळी केली. बंद यशस्वी करण्यासाठी नक्षलवाद्यांनी रस्त्यावर तोडून टाकलेली झाडे गावकºयांनी स्वत: बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मदत केली.असा बंद आपल्यावर लादून नक्षली आमचा जगण्याचा हक्क हिरावून घेत आहेत. ते सूडाच्या भावनेतून आदिवासींवर अत्याचार करत असून त्यांचा नाहक खून करत आहेत. त्यांनी हे त्वरित थांबवावे अन्यथा आम्हा गावकºयांच्या सहनशीलतेचा अंत होईल, अशी प्रतिक्रि या गावकऱ्यांनी व्यक्त करून नक्षलवाद्यांविरोधात घोषणा दिल्याचे पोलिसांकडून कळविण्यात आले.दरम्यान धानोरा तालुक्यातील मुरूमगाव-सावरगाव मार्गावर नक्षल्यांनी आडवी टाकलेली झाडे उचलल्यानंतर रात्री ८ वाजता या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. शुक्रवारी सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी