शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मेडीगड्डाचे प्रकल्पबाधित शेतकरी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 23:43 IST

महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील गोदावरी नदीवर उभारल्या जात असलेल्या तेलंगणा सरकारच्या मेडीगड्डा प्रकल्पात गडचिरोली जिल्ह्याच्या पाच तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची जमीन जात आहे. पण या शेतकऱ्यांना ‘प्रकल्पग्रस्त’ म्हणून मिळणारे कोणतेही लाभ दिले जाणार नाही.

ठळक मुद्देपाणी मिळणार तेलंगणाला : महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना ‘प्रकल्पग्रस्त’ म्हणूनही लाभ नाही !

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील गोदावरी नदीवर उभारल्या जात असलेल्या तेलंगणा सरकारच्या मेडीगड्डा प्रकल्पात गडचिरोली जिल्ह्याच्या पाच तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची जमीन जात आहे. पण या शेतकऱ्यांना ‘प्रकल्पग्रस्त’ म्हणून मिळणारे कोणतेही लाभ दिले जाणार नाही. प्रकल्पाचे पाणीही नाही किंवा प्रकल्पग्रस्त म्हणून लाभही मिळणार नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.तेलंगणा राज्याला भविष्यात सुजलाम सुफलात करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मेडीगड्डा प्रकल्पासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत वाहणाऱ्या गोदावरी नदीवर मोठे धरण उभारले जात आहे.या धरणाच्या बुडीत क्षेत्रात सिरोंचा तालुक्यातील कोचमपल्ली, वडधम, आइपेटा, तुरमूलमाल, पेंटीपाका या पाच तालुक्यातील १४४.५५ हेक्टर शेतजमीन येणार आहे. या जमिनीचे गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या जिल्हास्तरिय मूल्यांकन समितीने दर निश्चित करून त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना तेलंगणा सरकारकडून मोबदला दिला जात आहे.पहिल्या टप्प्यात ६२ लोकांची ७.२९ हेक्टर जमीन घेण्यात आली तर दुसऱ्या टप्प्याप ५८२ लोकांची ८७.५७ हेक्टर जमीन घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर प्रकल्पात यापैकी काही शेतकऱ्यांची जमीन अंशत: तर काहींची पूर्णत: जाणार आहे. तरीही कोणत्याही शेतकऱ्याला प्रकल्पग्रस्त म्हणून मिळणारे लाभ दिले जाणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.प्रकल्पासाठी काही शेतकऱ्यांची १०० टक्के शेतजमीन जाणार असली तरी ते पूर्णत: विस्थापित होत नसल्यामुळे त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणता येणार नाही, असे प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले.दरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन बुधवारी जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून त्यांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लवकर निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.विशेष म्हणजे या प्रकल्पाचे सर्व पाणी तेलंगणातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. एकीकडे महाराष्ट्रात दुसºया प्रकल्पांसाठी शेतकरी व इतर जमीनधारकांना चार पट जास्त मोबदला देऊन इतरही लाभ मिळत असताना या प्रकल्पासाठी गडचिरोली जिल्ह्यातील भोळ्याभाबड्या आदिवासी शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारकडून पाने पुसली जात आहे. परिणामी त्यांच्यात असंतोष पसरला आहे. लोकप्रतिनिधींनीही आश्वासन पाळले नसल्याचा आरोप होत आहे.तेलंगणाच्या शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतजमिनी देण्यास तयार झाले. त्यांना या प्रकल्पाचे पाणी नाही तर किमान प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र देऊन शासकीय लाभ देण्याची संवेदनशिलता महाराष्ट्र सरकारने दाखवावी. शेतकऱ्यांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊ नये.- भाग्यश्री आत्राम-हलगेकर, सभापती, जि.प. गडचिरोली

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प