शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेडिगड्डा प्रकल्पाने शेकडो एकर शेतजमीन बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

मेडीगड्डा बॅरेज होऊ नये, यासाठी सिरोंचा तालुक्यासह अहेरी उपविभागात विविध राजकीय पक्षाच्या वतीने अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुळीच विचार केला नाही. महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांना हाताशी धरून मेडीगड्डा बॅरेजला तेलंगणा सरकारने मंजुरी प्रदान केली.

ठळक मुद्देलागवडीचा खर्च पाण्यात : आरडा परिसरातील शेतकऱ्यांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर मेडीगड्डा प्रकल्प साकारला. या बॅरेजमुळे तेलंगणातील शेतकऱ्यांना फायदा झाला असला तरी दुसरीकडे सिरोंचा तालुक्यातील आरडा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेकडो एकर शेतजमिनीवरील पिके पाण्याखाली बुडाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.मेडीगड्डा बॅरेज होऊ नये, यासाठी सिरोंचा तालुक्यासह अहेरी उपविभागात विविध राजकीय पक्षाच्या वतीने अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुळीच विचार केला नाही. महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांना हाताशी धरून मेडीगड्डा बॅरेजला तेलंगणा सरकारने मंजुरी प्रदान केली. गतीने या बॅरेजचे कामही पूर्ण करण्यात आले. या बॅरेजचा फायदा तेलंगणातील शेतकऱ्यांना झाला. मात्र हा प्रकल्प सिरोंचा तालुक्यातील शेतकºयांच्या मुळावर उठल्याचे आता दिसून येत आहे. सद्य:स्थिती सिरोंचा तालुक्याच्या आरडा परिसरातील रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांमध्ये अतोनात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांची झोप पूर्णत: उडाली आहे.सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आरडा परिसरात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पदाधिकाºयांसह आरडा गावातील नागरिक रंगू किष्टय्या, येठला मल्लाना, पसूला नागेश, रंगू कमलाकर, पंतगी राजेश, ताल्लपली सदानंदम, रंगू रामप्रसाद, मारगोनी सत्यनारायण, रंगू राजू, रंगू सांभया, पसूला किष्टस्वामी, रवींद्र रंगू, येमुला राजू, नरेंद्र रंगू, मुरली रंगू, दामोदर रंगू, श्रीनिवास रंगू, रंगू मल्लया, रंगू लच्छना आदीसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.आरडा परिसरातील शेतकºयांनी कर्ज काढून आपली शेती विकसीत केली. मात्र मेडीगड्डा प्रकल्पामुळे मिरची, कापूस तसेच भाजीपाला पिकाचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.भाजीपाला पिकांसह मत्स्य व्यवसायालाही फटकामेडीगड्डा बॅरेजच्या अतोनात पाण्यामुळे भाजीपाला पिकांसह मत्स्य व्यवसायालाही जोरदार फटका बसला आहे. आरडा गावातील शेतकरी कापूस पिकासह मिरची, कोबी व इतर प्रकारच्या भाजीपाला पिकाची लागवड करीत असतात. यंदाही या पिकाची लागवड झाली होती. मात्र बॅरेजच्या पाण्यामुळे फटका बसला. मत्स्यबिज वाहून गेल्याने मत्स्य व्यवसायालाही फटका बसला.जलप्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीमेडीगड्डा बॅरेजमुळे सिरोंचा तालुक्याच्या आरडा गावातील व परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर कोलुरी, शहर अध्यक्ष विजय रंगुवार, नगर पंचायतचे स्वच्छता व आरोग्य सभापती सतिश भोगे, नगरसेवक विजय तोकला यांनी केली असून या संदर्भात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन दिले आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी