शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकारी आंदोलनावर

By admin | Updated: July 1, 2014 23:30 IST

राजपत्रित वैद्यकीय अधिकारी आजपासून आंदोलनावर गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवा कोलमडली असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मॅग्मो या संघटनेने दिला आहे.

आरोग्य सेवा कोलमडली : आंदोलन तीव्र करण्याचा इशारागडचिरोली : राजपत्रित वैद्यकीय अधिकारी आजपासून आंदोलनावर गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवा कोलमडली असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मॅग्मो या संघटनेने दिला आहे. आज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा मुख्यालयात निदर्शने करून आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाकडे सादर केले आहे.या आंदोलनात जिल्ह्यातील १५० वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे सामान्य रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, प्राथमिक आरोग्य पथक यांच्यातील काम पूर्णत: बंद झाले आहे. बहुतांश वैद्यकीय अधिकारी मुंबई येथे आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी गेलेले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास ११ जुलै २०१४ ला सामुहिक राजिनामे देण्याचा निर्णय वैद्यकीय अधिकारी संघटना गट अ ने घेतला आहे, अशी माहिती संघटनेच्यावतीने देण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासनाला पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २००९-१० मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकारी यांना पूर्वलक्ष लाभ मिळण्यात यावा, अस्थायी जवळपास ७८९ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी गट- ब व अस्थायी जवळपास ३२ बीडीएस वैद्यकीय अधिकारी गट - ब यांचे सेवा समावेशन करण्यात यावे, १ जानेवारी २००६ पासून राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांना ६ वा वेतन आयोग लागू करण्यात यावा, राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना केंद्रशासन व वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणे उच्च वेतन मिळणेबाबत, एमबीबीएस पदव्यूत्तर, बीएएमएस पदव्यूत्तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खातेअंतर्गत पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा व वैद्यकीय अधिकारी गट- अ यांची सेवा ज्येष्ठता यादी तत्काळ तयार करण्यात यावी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामांचे तास केंद्रशासन इतर राज्याप्रमाणे निश्चित करण्यासंदर्भात शासन निर्णयाद्वारे तयार केलेल्या गठित समितीच्या सादर झालेल्या अहवालानुसार तत्काळ उचित कार्यवाही सुरू करण्यात यावी, शासनदरबारी यापूर्वीच मान्य झालेल्या एनपीए आॅपश्नल (ऐच्छिक) करण्यात यावा व याबाबत तत्काळ कारवाई करण्यात यावी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना एनपीए पुनश्च चालु करण्यात यावा, सेवा अंतर्गत पदव्यूत्तर अभ्यासक्रमासंबंधी प्रलंबित जिव्हाळ्याचे प्रश्न व सेवेतील कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दृष्टीने पदव्यूत्तर अभ्यासक्रमासंबंधी उचित तत्काळ आदर्श धोरण ठरविण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात यावी, वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनासुद्धा ३ व ६ आगाऊ वेतनवाढीचा लाभ मिळवा, राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे व वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय केंद्र व इतर राज्याप्रमाणे ५८ वरून ६२ करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.