शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल चार वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी गायब

By admin | Updated: August 7, 2016 01:40 IST

तालुक्यातील वडधा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ गजानन मेश्राम हे मागील चार वर्षापासून सतत गैरहजर आहेत.

कारवाई शून्य : वडधा परिसरातील आरोग्य सेवा कोलमडली आरमोरी : तालुक्यातील वडधा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ गजानन मेश्राम हे मागील चार वर्षापासून सतत गैरहजर आहेत. एकच डॉक्टर असल्याने वडधा परिसरातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. मात्र संबंधित डॉक्टरवर अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. गजानन मेश्राम हे वडधा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २०१० मध्ये गट अ च्या वैद्यकीय पदावर रूजू झाले. अवघ्या दीड वर्षानंतर मे २०१२ पासून ते आजपर्यंत प्रशासनाला कोणतीही सूचना न देता परस्पर गैरहजर आहेत. तेव्हापासून सदर डॉक्टर गैरहजर असल्याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत प्रशासनाला देण्यात आली आहे. तरी सुध्दा या डॉक्टरांवर निलंबनाची कार्यवाही न करता पदाचे स्वरूप जैसेथे ठेवण्यात आले आहे. जवळपास ४० हजार लोकसंख्येच्या रूग्णसेवेचा भार वडधा प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरवशावर या आरोग्य केंद्राची सेवा सुरू असून रूग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. मेश्राम हे गेल्या चार वर्षापासून गैरहजर असताना सुध्दा त्यांच्यावर कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. लोकप्रतिनिधी व नागरिकांनी अनेकदा याबाबत सूचना देऊनही सदर डॉक्टरवर कारवाई करण्यात आली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने वायरल फिव्हरचा प्रकोप सुरू आहे. वडधा परिसरात गावांमध्ये शेकडो लोक तापाने फणफणत आहेत. येथे डॉक्टरांची कमतरता असल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. सदर डॉक्टर चार वर्षापासून सातत्याने गैरहजर असल्याने या संदर्भात शासनाने तत्काळ निर्णय घेणे अपेक्षीत होते. मात्र एकाच डॉक्टराच्या भरवशावर वडधा आरोग्य केंद्राचा कारभार सुरू असून येथील अनेक रूग्ण आरमोरीच्या उपजिल्हा रूग्णालयात रेफर केले जात आहेत. (शहर प्रतिनिधी)खासगी सेवेत दाखल सतत गैरहजर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मेश्राम यांनी वणी येथे आपला खासगी दवाखाना सुरू केला असून त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मात्र त्यांनी अजूनपर्यंत नोकरीचा राजीनामा दिला नाही.