शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मध्यस्थीने पैसा व श्रमाची बचत

By admin | Updated: June 19, 2017 01:44 IST

मध्यस्तीच्या माध्यमातून वाद सोडविल्यास पैसा, श्रम यांची मोठी बचत होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी आपसी वाद मध्यस्थीच्या माध्यमातून सोडवावे,

बी. एम. पाटील यांचे प्रतिपादन : अहेरीत मार्गदर्शन कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : मध्यस्तीच्या माध्यमातून वाद सोडविल्यास पैसा, श्रम यांची मोठी बचत होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी आपसी वाद मध्यस्थीच्या माध्यमातून सोडवावे, असे आवाहन मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांनी केले. अहेरी दिवाणी व फौजदारी, कनिष्ठ स्तर न्यायालयात मध्यस्थी केंद्र मार्गदर्शन कार्यक्रमादरम्यान प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे धर्मदाय आयुक्त सातव, सरकारी अभियोक्ता अभय शिखरे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना न्या. पाटील म्हणाले की, न्यायालयात विविध प्रकारची दिवाणी व फौजदारी प्रकरणे दाखल होतात. या प्रकरणाचा निकाल लागण्यास बराच उशीर होतो. याचा फटका दोन्ही पक्षकारांना बसतो. मध्यस्ती केंद्रात प्रकरण दाखल करण्यास कोणतेच शुल्क लागत नाही. तसेच दोन्ही पक्षकारांच्यसा बाजू लक्षात घेऊन मध्यस्तीने तडजोड करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे विविध कोर्टात अपिलमध्ये नेण्यापेक्षा तडजोडीतून वाद मिटतो. दोन्ही पक्षकारांच्या पैसा व श्रमाची बचत होण्यास फार मोठी मदत होते, असे प्रतिपादन न्या. पाटील यांनी केले. न्या. जाधव यांनी मार्गदर्शन करताना मध्यस्ती केंद्र हा सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणारा सोपा उपाय आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मध्यस्ती केंद्राचा उपयोग करावा, असे आवाहन केले. संचालन अ‍ॅड. संघरत्न कुंभारे तर आभार अ‍ॅड. उदय गलबले यांनी मानले. कार्यक्रमात अ‍ॅड. सतीश जैनवार, अ‍ॅड. राजेंद्र प्रसाद, मंगनवार, अ‍ॅड. ज्योती ढोके, अ‍ॅड. ममता गलबले आदी उपस्थित होते.