शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

शहीद जवान भगवान चहांदेच्या कुटुंबाची शासनाकडून उपेक्षा

By admin | Updated: December 10, 2014 22:56 IST

नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेल्या जवानांच्या वृध्द पित्याचा सरकारकडून मिळणाऱ्या मोबदल्यासाठी गेल्या साडेपाच वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष थांबणार कधी ?

गडचिरोली : नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेल्या जवानांच्या वृध्द पित्याचा सरकारकडून मिळणाऱ्या मोबदल्यासाठी गेल्या साडेपाच वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष थांबणार कधी ? हाच प्रश्न निर्माण झाला आहे. आपला मुलगा शहीद झाला. त्याला मिळणारे लाभ कधी मिळतील हे विचारण्यासाठी चोपचे दादाजी चहांदे हे सरकारच्या गृहखात्याची विविध कार्यालये दररोज पालथी घालत आहे. परंतु अजुनही गृहविभागाच्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. एकीकडे मुंबई दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब याच्यावर शासनाने कोट्यावधी रूपयाचा खर्च केला. मात्र जंगलात नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या आपल्या मुलाचे वेतनही अजुन शासनाने दिले नाही. सवलती लागू करण्याचा प्रश्नच गेल्या साडेपाच वर्षापासून प्रलंबित आहे. दादाजी चहांदे आपली व्यथा सांगताना म्हणाले की, मुलगा भगवान चहांदे हा गडचिरोली पोलीस दलात २००७ मध्ये दाखल झाला होता. १६ एप्रिल २००९ रोजी लोकसभा निवडणुकीची जबाबदारी पार पाडत असताना बंदूकीच्या गोळ्या लागून तो शहीद झाला. त्याच्या भरवश्यावर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी होती. तो पोलीस दलात आहे म्हणून एक बहिण व एका भावाला उच्च शिक्षण द्यावे, त्याचा खर्च मी उचलेन असे भगवान म्हणायचा. म्हणून दोघाही भावंडांना एमबीबीएसच्या शिक्षणासाठी नागपूरला प्रवेश दिला. परंतु २००९ मध्ये भगवान गोळी लागून शहीद झाला. राज्य सरकारच्या पोलीस विभागाने त्याला शहीदाचा दर्जा दिला. मानवंदना दिली व मला सानुग्रह मदत म्हणून २० हजार रूपये मुलाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी दिले. पण पुढे मात्र काहीच मदत मिळाली नाही. २००९ पासून शहीदांना मिळणारे लाभ, नियमित पगार, विशेष वेतन आदी मिळालेले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयातून १० लाखाऐवजी ५ लाखाची विमा रक्कम देण्यात आली. कमावता मुलगा गमाविल्यामुळे आता कुटुंब चालविण्यासोबतच दोन मुलांचा उच्च शिक्षणाचा खर्च करताना मला कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. परिचर म्हणून काम करणाऱ्या माझ्यासारख्या गरीब माणसाने मुलाच्या हक्काच्या लाभासाठी आणखी किती दिवस संघर्ष करायचा, असा त्यांचा सवाल आहे. परंतु लालफितशाहीत त्यांच्या मुलाच्या मोबदल्याची केस कुठे अडकली, हे सांगायलाही गृहखात्याचे अधिकारी तयार नाही. तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांचीही अनेकदा भेट घेतली. परंतु ते अधिकाऱ्यांकडे बोट दाखवितात, असा अनुभव चहांदे यांना आला. दरम्यान ५ जानेवारी २०१३ रोजी गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी राज्याच्या गृहमंत्रालयाचे अवर सचिव यांना पत्र लिहून शहीद जवान भगवान दादाजी चहांदे यांच्या कुटुंबाला संपूर्ण आर्थिक मदत द्यावी, अशी विनंती केली. परंतु अजुनही गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. यापूर्वी विधान परिषद सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाही या प्रकरणाबाबत पत्र दिले होते. त्या पत्राला ९ जून २०११ ला गृहमंत्र्यांनी उत्तर दिले व सदर प्रकरण उप सचिव गृहविभाग यांच्या कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे. परंतु अजुनपर्यंत शहीद जवान चहांदे यांच्या कुटुंबियांच्या पदरात एक कवडीही पडलेली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)