शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

विवाहित तरुणाची तीक्ष्ण शस्त्राने हत्या, मृतदेह कालव्यात फेकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 22:54 IST

प्राप्त माहितीनुसार, मृत आशिष हा मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास काही कामानिमित्त बाहेर जाऊन येतो, असे सांगून स्वतःच्या दुचाकी क्रमांक (एमएच ३३, आर ८१८६)ने गेला. परंतु, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध सुरू असताना सकाळी भगतसिंह वाॅर्ड ते तुकुम वाॅर्डलगत असलेल्या कालव्यात एक मृतदेह पडलेला असून, बाजूला दुचाकी असल्याचे काही लोकांना दिसले. दुचाकीच्या नंबरवरून ती आशिषचीच असल्याचे पोलिसांनी ओळखले.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : शहरातील भगतसिंग वॉर्डमधील रहिवासी आशिष रवी मेश्राम (२४ वर्षे) या विवाहित तरुणाची मंगळवारी रात्री डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह शहरालगतच्या कालव्यात टाकून देण्यात आला. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्याची हत्या कशासाठी झाली आणि कोणी केली, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.प्राप्त माहितीनुसार, मृत आशिष हा मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास काही कामानिमित्त बाहेर जाऊन येतो, असे सांगून स्वतःच्या दुचाकी क्रमांक (एमएच ३३, आर ८१८६)ने गेला. परंतु, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध सुरू असताना सकाळी भगतसिंह वाॅर्ड ते तुकुम वाॅर्डलगत असलेल्या कालव्यात एक मृतदेह पडलेला असून, बाजूला दुचाकी असल्याचे काही लोकांना दिसले. दुचाकीच्या नंबरवरून ती आशिषचीच असल्याचे पोलिसांनी ओळखले. दरम्यान, देसाईगंज पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. उत्तरीय तपासणीत मृतदेहाच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राचे घाव दिसून आले. त्यामुळे त्याची हत्या झाल्याचा निष्कर्ष काढून पोलिसांनी भादंवि कलम ३०२ नुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. मृत आशिष मेश्राम यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी व मुलगा असा आप्तपरिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुजाता भोपळे करत आहेत.

मारेकरी तीनपेक्षा जास्त असण्याची शक्यता-    मृत आशिष हा शरीरयष्टीने दणकट होता. त्यामुळे त्याला मारणारे एक-दोन लोक नसून किमान तीन किंवा त्यापेक्षा जास्त लोक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घटनास्थळाजवळच असलेल्या त्याच्या दुचाकीचा हेडलाईट फुटलेला होता. कोणत्या तरी वादातून त्याची हत्या झाल्याची शक्यता असून, तो वाद कोणता हे शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

व्यावसायिक कारणातून झाली हत्या?-    मृत तरुण हा अनधिकृत दारूविक्रीच्या व्यवसायात गुंतलेला होता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे व्यावसायिक व्यवहार किंवा स्पर्धेतून तर त्याची हत्या झाली नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्याचा मोबाइल जप्त करण्यात आला असून, त्याचे शेवटचे लोकेशन, शेवटी आलेले कॉल डिटेल्स यावरून आरोपींचा शोध घेणे पोलिसांकरिता सोपे होणार आहे. त्यासाठी मोबाइलचा सीडीआर मागविण्यात आला आहे.

 रात्री ९ वाजल्यापासून आशिषचा मोबाइल बंद 

-    लवकरच येतो, असे सांगून रात्री ८ वाजता घरून गेलेला आशिष परत न आल्यामुळे घरच्यांनी त्याच्या मोबाइलवर संपर्क केला असता, रात्री ९ वाजल्यापासून त्याचा मोबाइल सातत्याने बंद असल्याचे दाखवत होता. त्यामुळे त्याचवेळी त्याची हत्या झाली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावरून जवळपास १० ते ११ तास मृतदेह कालव्याच्या पाण्यात पडून होता. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी