शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेतील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:54 IST

दोन दिवसापूर्वी दुर्गा मंदिरासमोरिल नगर परिषद शॉपींग सेंटर जवळील मुख्य मार्गावरील दुकानदारांचे अतिक्रमण हटविल्यानंतर १६ मार्चला शुक्रवारी एका कापड दुकानाच्या मालकाने थेट मुख्य मार्गावर आणलेल्या पायऱ्या नगर परिषदने मुख्याधिकारी डॉ. कुलभुषण रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली काढून फेकले.

ठळक मुद्देपालिकेची दुसऱ्या दिवशी कारवाई : अतिक्रमणधारक व्यावसायिकांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : दोन दिवसापूर्वी दुर्गा मंदिरासमोरिल नगर परिषद शॉपींग सेंटर जवळील मुख्य मार्गावरील दुकानदारांचे अतिक्रमण हटविल्यानंतर १६ मार्चला शुक्रवारी एका कापड दुकानाच्या मालकाने थेट मुख्य मार्गावर आणलेल्या पायऱ्या नगर परिषदने मुख्याधिकारी डॉ. कुलभुषण रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली काढून फेकले. या कारवाईमुळे अतिक्रमणधारकाचे धाबे दणाणले आहेत.नगर परिषद मध्ये मालमत्ता क्रमांक ६४ म्हणुन नोंद असलेल्या तसेच मौजा देसाईगंज नझूल शहर खसरा नंबर २२ मधील प्लाट नंबर २८ क्षेत्रफळ २५०० चौ फुट तसेच नझूलच्या शासकिय जागा खसरा नंबर २३/१० एकूण क्षेत्रफळ २५०० चौ. फुट अशी एकुण ५००० चौ फुट क्षेत्रफळाची जागा आहे. या क वर्ग असलेल्या देसाईगंज नगर परीषद हद्दीत जागेवर तळघर, तळमजला अधिक प्रथम मजला, द्वितीय मजला, तृतिय मजला व चौथा मजलाचे नियमबाह्य व बेकायदेशिररित्या अनाधिकृतपणे बिनापरवानगी संरचनात्मक बांधकाम केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ मधील तरतुदीचे पुर्णत: उल्लंघन झाले.याबाबत आजुबाजुच्या रहिवासी धारकांनी लेखी तक्रारी केल्या. परंतु राजकिय हस्तक्षेपामुळे यांना अवैद्य बांधकामाला अभय मिळत होते. मात्र १० मार्च २०१९ ला आदर्श आचारसंहिता लागताच शहरात झालेला अतिक्रमण काढताना राजकिय हस्तक्षेप होणार नसल्याने नगर परिषद प्रशासन मागील दोन दिवसापासून शहरातील अतिक्रमणधारकांवर कारवाईचा बडगा उगारुन अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम हाती घेतली असल्याचे सांगीतले जात आहे.वारंवार सूचना देऊन ही दररोज भरत असलेल्या दुर्गा मंदिरासमोरील खुल्या मैदानात सकाळच्या गुजरीत मनमानी करुन बाजारपेठ कंत्राटदाराला न जुमानता मुख्य रस्त्यावर आलू, लसन, कांद्याचा दुकान थाटुन वाहतूकीला अडथळा निर्माण करणाºया दुकानदारांवर देसाईगंज नगरपरीषदचे मुख्याधिकारी डॉ. कुलभुषन रामटेके यांनी कारवाईचा बडगा उगारुन रस्त्यावर अतिक्रमण करून दुकान थाटणाºयाविरुद्ध दोन दिवसापुर्वीच तातडीने कारवाई केल्याने अतिक्रमणधारकांचे चांगलेच धाबे दणाणले होते. या मोहिमेने अतिक्रमणधारक हादरले आहेत.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण