शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

झाडीपट्टीतील मंडई, नाटकांवर घाेंघावतेय ओमायक्रॉनचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 05:00 IST

भाऊबीजेच्या सणापासून एक महिना अनेक ठिकाणी नाटकांचे व मंडईचे आयोजन केले होते. पण, आता देशातील काही मोठ्या शहरांमध्ये  ओमायक्राॅनचा संसर्ग दिसून येत असल्याने प्रशासनाने नवीन निर्बंध घातले. त्यात झाडीपट्टीतील मंडई, नाटक कचाट्यात सापडले आहे. आता संपूर्ण राज्यात जमावबंदी आदेशाची अंमलबजावणी झाल्यास सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी मंडई, नाटकांसाठी दिली जाणारी परवानगी नाकारली जाण्याची शक्यता आहे.

प्रदीप बोडणेलाेकमत न्यूज नेटवर्कवैरागड : दिवाळीचा सण आटोपताच पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मंडई व नाटकांची रेलचेल असते. गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गाने झाडीपट्टीची रंगभूमी ओस पडली होती. या वर्षी पुन्हा मंडई आणि नाटकांना चांगले दिवस येतील असे वाटत असतानाच ओमायक्रॉनचे सावट घोंघावत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समस्त नाट्यकलावंत आणि नाटकांवर विसंबून असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचा जीव टांगणीला लागला आहे.भाऊबीजेच्या सणापासून एक महिना अनेक ठिकाणी नाटकांचे व मंडईचे आयोजन केले होते. पण, आता देशातील काही मोठ्या शहरांमध्ये  ओमायक्राॅनचा संसर्ग दिसून येत असल्याने प्रशासनाने नवीन निर्बंध घातले. त्यात झाडीपट्टीतील मंडई, नाटक कचाट्यात सापडले आहे. आता संपूर्ण राज्यात जमावबंदी आदेशाची अंमलबजावणी झाल्यास सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी मंडई, नाटकांसाठी दिली जाणारी परवानगी नाकारली जाण्याची शक्यता आहे.अनेक मंडळांनी नाटक, मंडईच्या तारखा निश्चित केल्या आहेत. त्याची पत्रकेही काढून जय्यत तयारी झाली आहे. पण, संसर्ग वाढल्यास खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित विभागाने नाटकासाठी दिली जाणारी परवानगी नाकारल्यास झाडीपट्टीतील अनेकांवर पुन्हा उपासमारीची पाळी येणार आहे.मागील दोन वर्षांपासून झाडीपट्टीतील नाट्यवेड्या रसिकांचा हिरमोड होत आहे. या वर्षात कोरोनाचा संसर्ग अत्यल्प प्रमाणात झाला असताना आता ओमायक्रॉनच्या भीतीने नाटकाचा अंक बंद होण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाने खुल्या जागेवरील कार्यक्रमांसाठी क्षमतेपेक्षा २५ टक्के उपस्थितीचा नियम नुकताच लागू केला आहे. 

सुगीच्या दिवसात मनोरंजन झाडीपट्टीत भाऊबीजेपासून दिवसा गावात मंडई आणि रात्री मनोरंजनासाठी नाटकाचा प्रयोग आयोजित केला जातो. खरिपाचा हा हंगाम आटोपला की झाडीपट्टीच्या माणसासाठी हा काळ म्हणजे आनंदाची पर्वणी असते. १२ महिने शेतात राबणाऱ्या माणसासाठी हा सुगीचा काळ असतो. आपल्या गावात नाटक, मंडई व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. झाडीपट्टीचा माणूस आपल्या पदरचे चार पैसे खर्च करण्यास मागेपुढे पाहात नाही. त्यानिमित्ताने पाहुण्यांच्या गाठीभेटी, रोटीबेटीचे व्यवहार चालतात.

झाडीपट्टीवर बेरोजगारीचे सावटदोन ते अडीच महिन्यांच्या काळात झाडीपट्टीच्या रंगभूमीवरील लेखक-कलावंत, नेपथ्य, डेकोरेशन अशा दोन हजारांपेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळतो, तो कोरोनाने हिरावला आहे. मंडईत अनेकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. विविध प्रकारच्या वस्तू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा व्यवसाय निर्बंधांमुळे बंद होण्याची शक्यता आहे. झाडीपट्टीत नाटक, मंडईबरोबर गावातील लोककला प्रकार, दंडार, तमाशा, गोंधळ या लोकप्रकारांतील कलाकारांवरही बेरोजगारीची वेळ येऊ शकते.

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉन