ग्रामपंचायतीत ठराव पारित : मुक्तीपथ अभियानचा पुढाकारचामोर्शी : महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडा येथे दरवर्षी यात्रा भरते. यंदाही यात्रा व्यसनमुक्त करण्याचा ठराव मार्र्कंडा ग्रामपंचायत व मार्र्कंडा मंदिर ट्रस्ट यांनी घेतला आहे. यात्राकाळात व्यसनी पदार्थ विक्री न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात मार्र्कंडा ग्रामपंचायतमध्ये सभा पार पडली. या सभेत यात्रा परिसरात लागलेल्या अवैध खर्रा विक्री दुकानावर कायदेशीर कारवाई होणार असून प्रशासनाकडून नजर ठेवली जाणार आहे. तसेच अवैध पदार्थाची विक्री करून कारवाईला समोर जाऊ नये असे आवाहन मुक्तीपथ अभियानाकडून करण्यात आले आहे. मार्र्कंडा व चपराळा यात्रेत मुक्तीपथ अभियानाच्या वतीने व्यसनाच्या दुष्परिणामाचे पोस्टर लावून जनजागृती केली जाणार आहे. या बैठकीला मुक्तीपथ अभियानाचे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांनी लोकांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ तसेच दारू विक्री संदर्भात कायदे कडक झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी मुक्तीपथचे उपसंचालक संतोष सावलकर, मुक्तीपथ चामोर्शीचे संघटक संदीप वखरे, मुलचेरा संघटक सागर गोतपागर, मार्र्कंडाच्या सरपंच ललिता मरस्कोल्हे, उपसरपंच सेविकांत आभारे, पोलीस पाटील आरती आभारे, मार्र्कंडा देवस्थान समितीचे सचिव मृत्यूंजय गायकवाड, प्रकाश आभारे, रवी राऊत, श्यामराव राऊत, गुरूदास चुधरी, मिथून भाकरे, उमाकांत गवेकर, राजू आत्राम, बाबुराव गदेकार, गणेश जध्यालवार, मुखरू राऊत आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
मार्कंडा यात्रा खर्रामुक्त करणार
By admin | Updated: February 21, 2017 00:42 IST