प्रदर्शनी व व्याख्यान : गडचिरोली, अहेरी, चामोर्शी येथे कार्यक्रम गडचिरोली : साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन सोमवारी मराठी राजभाषा दिन म्हणून जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात आला. या निमित्ताने परिसंवाद, व्याख्यान व विविध कार्यक्रम घेण्यात आले. गडचिरोली - येथील विद्याभारती कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य भोजराम कुंभरे होते. प्रमुख अतिथी म्हणून वंदना मुनघाट, संजय गद्देवार उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींनी कवितांचे वाचन केले. तर शिक्षिका देवला बानबले यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा रामटेके तर आभार घोनमोडे यांनी मानले. अनंत पाम्पट्टीवार, जयंत येलमुले, गोहणे, सुनंदा लटारे यांनी सहकार्य केले. महिला महाविद्यालयात मराठी भाषा दिन कार्यक्रमानिमित्त काव्यवाचन व भित्तीचित्र प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हंसा तोमर होत्या. यावेळी अॅड. पल्लवी केदार, प्रा. परिनिता घडुले, प्रा. डॉ. लता सावरकर उपस्थित होत्या. कार्यक्रमात नुरसबा सय्यद, ज्ञानिका पारधी, मोनाली वालको, माधुरी धोंगडे, नीलम मल्लेलवार, पूजा बंडावार, प्रियंका दर्राे, मनीषा भंडारे यांनी कविता सादर केल्या. यशस्वीतेसाठी प्रा. बोधाणे, प्रा. योगेश पाटील, प्रा. त्रिपाठी, प्रा. ज्ञानेश बन्सोड, प्रा. साळवे, प्रा. दुमाने, प्रा. रचना पाटील, प्रा. भुरले, टेप्पलवार, वाईलकर यांनी सहकार्य केले. अहेरी - येथील एसटी आगारात मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगारप्रमुख चंद्रभूषण घागरगुंडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. गजानन जंगमवार, प्रकाश दुर्गेे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन वामन चिप्पावार यांनी केले. चामोर्शी - येथील कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ‘२१ व्या शतकातील मराठी भाषेसमोरील आव्हाने’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. यात अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक अश्विनी भिसे, द्वितीय क्रमांक रेशीम बोरूले, तृतीय क्रमांक ओंकार पेशट्टीवार यांनी पटकाविला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. जी. म्हशाखेत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. राजेंद्र झाडे, प्रा. संजय म्हस्के, प्रा. शीतल बोमकंटीवार, प्रा. दीपिका हटवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन ओंकार पेशट्टीवार यांनी केले. शहर प्रतिनिधी)
मराठी राजभाषा दिन साजरा
By admin | Updated: March 1, 2017 01:42 IST