शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

बसवा राजूच्या एन्काउंटरनंतर माओवादी बिथरले, भारत बंदची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:02 IST

पत्रकातून आगपाखड : देशभर स्मारक सभा घेण्याची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) सरचिटणीस व माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव ऊर्फ बसवा राजू (७०) हा २१ मे रोजी छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ठार झाला. या चकमकीत एकूण २७ माओवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले. यानंतर माओवादी सैरभैर झाले आहेत.

माओवाद्यांचा केंद्रीय समिती सदस्य भूपती ऊर्फ अभय याचे २८ मे रोजी जारी झालेले पत्रक समोर आले असून, त्यात त्याने बसवा राजूच्या एन्काऊंटरबद्दल आगपाखड केली आहे. १० जून रोजी भारत बंदची हाक देत त्याने देशभर स्मारक सभादेखील आयोजित करणार असल्याचीही घोषणा केली आहे. 

छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर २१ मे रोजी माओवादी व जवानांत जोरदार चकमक झाली होती. यात नंबाला केशव राव ऊर्फ बसवा राजूचा मृत्यू झाला होता. चार दशकांनंतर पहिल्यांदाच नक्षलवाद्यांचा मोठा नेता मारला गेल्याने चळवळीला मोठा धक्का बसला आहे. केंद्र सरकारने शांतता आणि युद्धबंदीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करत २७ नक्षलवाद्यांची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. जानेवारी २०२४ पासून केंद्र सरकारने अशाच पद्धतीने ५४० नक्षलवाद्यांना मारल्याचा आरोपदेखील या पत्रकात केला आहे. केंद्र सरकारच्या याच धोरणाचा विरोध करण्यासाठीच १० जूनला देशव्यापी बंदचे आवाहनही नक्षलवाद्यांनी केले आहे. एवढेच प्रवक्ता अभय याने जारी केलेले हेच नाही तर ११ जून ते ३ ऑगस्टदरम्यान ते पत्रक.

बसवा राजू आणि इतर मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतीत 'स्मारक सभा' आयोजित करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. नक्षल चळवळीतील बसवा राजूच्या प्रवासाची इत्थंभूत माहितीही पत्रकात दिली आहे.

शोषण आहे तोपर्यंत चळवळ संपणार नाही१९७२ साली नक्षल चळवळीचा संस्थापक चारू मुजुमदारच्या मृत्यूनंतरही असेच दावे केले जात होते. मात्र, १९७८ दरम्यान आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांत चळवळ पुन्हा उभी राहिली. १९९९ सालीदेखील केंद्र समिती सदस्य श्याम, मुरली आणि महेशला ठार करून प्रशासनाने असाच दावा केला होता. पण ही चळवळ सुरूच राहिली. चारू मुजुमदारनंतर गेल्या ५३ वर्षात अनेक मोठे नेते मारले गेले. तरीही ही चळवळ पुन्हा उभी राहिली. जोपर्यंत देशात शोषण आहे तोपर्यंत ही चळवळ संपणार नाही, असेदेखील पत्रकात शेवटी नमूद केले आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी