शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

जहाल माओवादी दाम्पत्यासह महिलेचे आत्मसमर्पण, तिघांवर होते ३८ लाखांचे बक्षीस

By संजय तिपाले | Updated: February 14, 2025 22:12 IST

मंगलसिंग, वसंतीचा समावेश

गडचिरोली: दोन दशकांपासून माओवाद्यांच्या  चळवळीत कार्यरत   व सदस्य ते उपकमांडर अशी मजल मारुन अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेला जहाल नेता  विक्रम ऊर्फ मंगलसिंग याने पत्नी वसंती उर्फ सुरेखासह अन्य एक जहाल महिला अशा एकूण तिघांनी १४ फेब्रुवारी रोजी आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर शासनाने ३८ लाखांचे बक्षीस ठेवले होते.

११ फेब्रुवारीला भामरागड तालुक्यातील छत्तीसड सीमेवरील दिरंगी आणि फुलनार जंगलातील चकमकीत महेश नागुलवार या जवानाला वीरगती प्राप्त झाली होती, या पार्श्वभूमीवर या तिघांच्या आत्मसमर्पणनाने नक्षलविरोधी अभियानाला बळ मिळाले आहे.

विक्रम ऊर्फ मंगलसिंग ऊर्फ संदीप सहागु तुलावी (४०) , वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजू हिडामी ( ३६, दोघे रा. गुर्रेकसा ता. धानोरा) , नीलाबाई उर्फ अनुसया बंडू उईके (५५,रा. मेडपल्ली ता. भामरागड) अशी त्यांची नावे आहेत. मंगलसिंग हा केंद्रीय समितीसह विभागीय समितीत होता, शिवाय उपकमांडर म्हणून तो कंपनी क्र. १० साठी काम करायचा.  वसंती ही सी- सेक्शन कमांडर म्हणून कंपनी क्र. १० मध्ये कार्यरत होती तर नीलाबाई उर्फ अनुसया ही विभागीय समिती सदस्य कुतुल दलम, माड डिव्हिजनमध्ये होती. आत्मसमर्पणानंतर या तिघांना आता १५ लाखांचे बक्षीस मिळणार आहे. नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल,  उपमहानिरीक्षक (अभियान) अजयकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, १९१ बटालियनचे कमांडन्ट सत्य प्रकाश  यांच्या मार्गदर्शनाखाली हे आत्मसमर्पण झाले.  

गुन्हेकारकीर्द अशी...विक्रम ऊर्फ मंगलसिंगहा २००४ मध्ये  टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला. २००७ मध्ये माडमधील कुतुल एरीयामध्ये वैद्यकीय कामकाजाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्याने डॉक्टर म्हणून जखमी माओवाद्यांवर उपचार देखील केले.  त्याची पत्नी वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो ही २००८ मध्ये क्रांतीकारी आदिवासी महिला संघटनेतून माओवादी चळवळीत सक्रिय झाली. डॉक्टर टीमसह टेलर टीममध्येही तिने काम केले. नीलाबाई ऊर्फ अनुसयाही १९८८ पासून माओवादी चळवळीत आहे. भामरागड दलममधून तिने प्रवास सुरु केला.  छत्तीसगडच्या कोहलीबेडा दलममध्येही तिने काही वर्षे काम केले. नवीन सदस्यांना माओवादी चळवळीची माहिती देण्याचे व नक्षल साहित्यांच्या भाषांतराचे काम तिने केले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली