शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात महिला व विद्यार्थिनींनी जाळले नक्षली बॅनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 19:59 IST

गडचिरोली जिल्ह्यात महिला व विद्यार्थिनींनी पोलिसांच्या मदतीने बॅनर हटवून नक्षलवाद्यांच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध केला.

ठळक मुद्देभूसुरुंगाच्या देखाव्यामुळे दहशत, वाहतूकही खोळंबली होतीताडगाव येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आलापल्ली ते भामरागड मार्गावरील ताडगावलगत मंगळवारी पहाटे नक्षलवाद्यांनी रस्त्यावर बॅनर बांधून ८ मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करण्यासंबंधीचे आवाहन केले होते. याशिवाय रस्त्यावरच बॅनरने झाकून भूसुरूंगसदृश डबे ठेवल्यामुळे दहशत पसरून वाहतूक ठप्प झाली होती. परंतू नंतर पोलिसांच्या मदतीने ते बॅनर हटवून महिला व विद्यार्थिनींनी बॅनर जाळत नक्षलवाद्यांच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध केला.नक्षलवादी एकीकडे याच तालुक्यातील इरपनार गावातील बेबी मडावी या युवतीचा निर्घृण खून करतात आणि दुसरीकडे महिला दिन साजरा करण्याच्या नावावर दहशत पसरविण्याचा प्रयत्न करतात, हे खपवून घेतले जाणार नाही. नक्षलवाद्यांनी अल्पवयीन मुलींचा देशविघातक कृत्यांसाठी वापर थांबवावा, बेबी मडावी जिंदाबाद, नक्षलवादी मुर्दाबाद, असे नारेही यावेळी विद्यार्थिनींनी दिले.

आतापर्यंत केले २२ महिलांचे खूननक्षलवाद्यांनी आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील २२ निरपराध महिलांचे खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ताडगाव पंचक्रोशीतील महिला व विद्यार्थिनींनी नक्षलवाद्यांचा निषेध करीत दाखविलेल्या धाडसाचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक केले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी