शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

तडजाेडीतून वसूल झाले तब्बल २ काेटी १६ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 05:00 IST

२५ सप्टेंबर रोजी येथे आयाेजित  लाेक न्यायालयात तडजोडीस पात्र ९१८ दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून २ काेटी १६ लाख ९७ हजार १६० रुपयांची वसुली करण्यात आली. यामध्ये ट्राफिक चालानच्या दाखलपूर्व प्रकरणांमधील  १४ हजार ७०० रुपयांच्या वसुलीचा अंतर्भाव आहे. किरकोळ स्वरूपाची  ४३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २५ सप्टेंबर रोजी येथे आयाेजित  लाेक न्यायालयात तडजोडीस पात्र ९१८ दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून २ काेटी १६ लाख ९७ हजार १६० रुपयांची वसुली करण्यात आली. यामध्ये ट्राफिक चालानच्या दाखलपूर्व प्रकरणांमधील  १४ हजार ७०० रुपयांच्या वसुलीचा अंतर्भाव आहे. किरकोळ स्वरूपाची  ४३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधि सेवा प्राधिकरण गडचिरोलीचे अध्यक्ष यू. बी. शुक्ल, व जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव डी. डी. फुलझेले यांच्या देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले हाेते.जिल्हा न्यायाधीश १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, यू. एम. मुधोळकर यांनी पॅनल क्रमांक १ वर काम पाहिले.  जिल्हा न्यायाधीश २ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. जी. कांबळे यांनी पॅनल क्रमांक २ वर काम पाहिले. पॅनल क्र. ३ वर  दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) तथा मुख्य न्यायदंडाधिकारी एम. आर. वाशिमकर, तर पॅनल क्र. ४ वर  दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी आर. आर. खामतकर यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. प्रथमच दाखलपूर्व ट्राफिक केसेसकरिता तिसऱ्या क्रमांकाचे स्वतंत्र पॅनल ठेवण्यात आले हाेते.पॅनल क्र. १ मध्ये पॅनल सदस्य म्हणून अधिवक्ता कविता सी. मोहरकर आणि विधि स्वयंसेविका वर्षा मनवर, पॅनल क्र. २ मध्ये पॅनल सदस्य म्हणून अधिवक्ता, एस. एस. भट आणि विधि स्वयंसेवक अकील शेख यांनी काम पाहिले. ट्राफिक चालानच्या दाखलपूर्व प्रकरणाकरिता अधिवक्ता प्रणाली वासनिक, विधि स्वयंसेवक, दिनेश बोरकुटे यांनी आणि अधिवक्ता एस. एस. बारसिंगे, समाजसेविका सुरेखा बारसागडे यांनी पॅनल क्रमांक चारची जबाबदारी पार पाडली. लाेकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रवींद्र दोनाडकर, जिल्हा वकील संघाचे ज्येष्ठ अधिवक्ता आणि इतर न्यायालयातील वकील वृंद व न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधि सेवा प्राधिकरण  गडचिरोलीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले आणि दाखलपूर्व खटले आपसी तडजाेडीने निकाली निघाल्यामुळे अनेकांना दिलासा मिळून खर्चही वाचला आहे.

 

टॅग्स :Lokadalatलोकअदालत