शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

अनेक धान खरेदी केंद्र अजूनही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

धान खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून कधी गोदाम पूर्ण तर कधी बारदान्याचा तुटवडा या विविध कारणांमुळे सदर केंद्र बंद पडले होते. त्यामुळे पाहिजे, त्या प्रमाणात धान खरेदीला गती आली नाही. शासकीय धान खरेदी केंद्राची मुदत ३१ मार्चपर्यंत राहते. त्यानंतर धान खरेदी केंद्र बंद केले जाणार आहेत. आजपर्यंत केवळ ३० ते ४० टक्केच धानाची विक्री झाली आहे.

ठळक मुद्देसमस्या गंभीर : कोरेगावातील गोदाम फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे दोन व आदिवासी विकास महामंडळाचा एक असे एकूण तिन्ही धान खरेदी केंद्र आहेत. यातील दोन खरेदी केंद्र बंद पडले आहेत.देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथे जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे याच वर्षी धान खरेदी केंद्र सुरू झाले आहे. मात्र भरडाईचे कंत्राट असलेल्या राईसमिलधारकांनी धान्याची उचल केली नाही. त्यामुळे गोदाम पूर्ण फुल्ल भरले आहे. धान खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून कधी गोदाम पूर्ण तर कधी बारदान्याचा तुटवडा या विविध कारणांमुळे सदर केंद्र बंद पडले होते. त्यामुळे पाहिजे, त्या प्रमाणात धान खरेदीला गती आली नाही. शासकीय धान खरेदी केंद्राची मुदत ३१ मार्चपर्यंत राहते. त्यानंतर धान खरेदी केंद्र बंद केले जाणार आहेत. आजपर्यंत केवळ ३० ते ४० टक्केच धानाची विक्री झाली आहे. अनेक शेतकऱ्यांकडे धान पडून आहे. जे मिलधारक गतीने मिलिंग करीत नाही, अशांकडील परवाना काढून घेऊन तो दुसºया मिलधारकांना द्यावा. कोणत्याही परिस्थितीत धान केंद्र चार दिवसात सुरू करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.जारांवडी केंद्रावर बारदान्याचा अभावएटापल्ली : जारावंडी येथील धान खरेदी केंद्रावर बारदाना नसल्याने २५ जानेवारीपासून या केंद्रावरील धान खरेदी पूर्णपणे ठप्प पडली आहे. जारावंडी केंद्राच्या सभोवतालच्या २५ गावातील शेतकरी या केंद्रावर धानाची विक्री करतात. दुर्गम भागात व्यापारी धान खरेदी करीत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंद्रावरच धानाची विक्री करावे लागते. बारदाना उपलब्ध करावा, अशी मागणी आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड