गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी प्रधानमंत्री जन-धन योजनेचा शुभारंभ दिल्ली येथे केला. त्याचवेळी देशभरात सर्वच राज्यात या योजनेचा शुभारंभ स्थानिकस्तरावर करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील कुरूळ, पिंपळगाव, कमलापूर, देऊळगाव व इतर भागात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अनेक नागरिकांनी आपले बँक खाते उघडले.चामोर्शी येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्यावतीने कुरूळ येथे ग्रामपंचायत सभागृहात जन-धन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सय्यद यांनी योजनेची सविस्तर माहिती खातेदारांना दिली. यावेळी खाते उघडणाऱ्या नागरिकांना पासबुक व एटीएम कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी उपसरपंच टी. एम. धोडरे, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष के. बी. रायसिडाम, ग्रामसेवक प्रधान उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केशव नैताम, तेजस मेकर्तीवार, दिलीप चलाख, देवराव सातपुते, मोरेश्वर भोयर यांनी सहकार्य केले.कमलापूर येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत जन-धन योजनेचा शुभारंभ बँकेचे अधिकारी एस. आर. फरकाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संचिता खोब्रागडे, मंजुश्री कुसराम, मनोहर चकीनारपवार उपस्थित होते. बँकेतील बचतीचे फायदे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम याविषयी फरकाडे यांनी माहिती दिली. कमलापूर परिसरातील दुर्गम भागातील नागरिकांनी जन-धन योजनेच्या लाभासाठी बँक खाते उघडावे व बचत करून घ्यावी, असे आवाहन बँकेच्या अधिकाऱ्यांनी केले. यावेळी जन-धन योजनेच्या लाभाविषयी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी कमलापूर, कोडसेलगुडम, आसा, नैनगुडम आदी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत जन-धन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विशेष शिबर लावून १०८ खाते संकलीत करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पंचायत समितीचे सभापती परसराम टिकले, संवर्ग विकास अधिकारी मोडक यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखा प्रबंधक टी. व्ही. आमगावकर यांनी केले. त्यांनी जन-धन योजनेच्या लाभाविषयी माहिती दिली. तसेच जन-धन योजनेचे स्वरूप समजावून सांगितले. गावकऱ्यांनी आपल्या व्यवहारासाठी पैसा व वेळ खर्च करून दूर जाण्याची गरज आता राहिली नाही. बँक आपल्या दारी आली असून बीसीएच्यावतीने गावात खाते उघडने व जवळील सेंटरवर जाऊन आपल्याला नकळत व्यवहार करण्याची सोय आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झाली आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा व बचत करण्यास प्रवृत्त व्हावे, असे आवाहन पं. स. सभापती परसरात टिकले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार पिंपळगावचे पोलीस पाटील मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परमानंद शेंडे, पी. के. बारापात्रे, रमेश मेंढे, महेंद्र दुधे, गजानन देशमुख यांनी सहकार्य केले. आरमोरी तालुक्यातील देऊळगाव येथे शिबर घेऊन जन-धन योजनेचा शुभारंभ ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आला. यावेळी डोंगरसावंगी, इंजेवाही येथील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाला सरपंच हरिदास सयाम, व्यवस्थापक के. एस. बहादुरे, प्रकाश बनपुरकर, नरहरी हरडे, मनोज बनपुरकर उपस्थित होते. यावेळी नागरिकांना पासबुकचे वितरण करण्यात आले.
जिल्ह्यात जन-धन योजनेचे अनेकांनी उघडले खाते
By admin | Updated: August 30, 2014 23:46 IST