शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

अनेक व्यवसायांना बंदीतून शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:01 IST

ग्रामीण क्षेत्रात कार्यरत उद्योग तसेच नगर परिषदा/ नगर पंचायतींच्या क्षेत्राबाहेरील उद्योग व कारखाने, विशेष आर्थिक क्षेत्रात कार्यरत औद्योगिक वसाहती ज्या ठिकाणी औद्यागिक आवारातच किंवा नजीकच्या इमारतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देकलम १४४ मध्ये अंशत: बदल : ग्रीन झोनमुळे काही व्यवहारांना परवानगी, पण खबरदारी घ्यावी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हयात लागू असलेले कलम १४४ (१)(३) मध्ये जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी अंशत: बदल करून सुधारित आदेश निर्गमित केले आहेत. यामध्ये कोरोना संसर्गाबाबत खबरदारी घेण्याच्या अटीवर विविध कामांना बंदीमधून वगळण्यात आले आहे. फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये २० एप्रिल पासून ३ मे च्या मध्यरात्रीपर्यंत ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश, नियमावली आणि उपाययोजना लागू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश निर्गमित केले आहेत.ग्रामीण क्षेत्रात कार्यरत उद्योग तसेच नगर परिषदा/ नगर पंचायतींच्या क्षेत्राबाहेरील उद्योग व कारखाने, विशेष आर्थिक क्षेत्रात कार्यरत औद्योगिक वसाहती ज्या ठिकाणी औद्यागिक आवारातच किंवा नजीकच्या इमारतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे. तसेच कोरोनाबाबत सर्व आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व कृषी, फलोत्पोदन संबंधित प्रक्रि या, पॅकींग व वाहतुक, असे उत्पापदन केंद्र जे अविरत चालू राहणे आवश्यक आहेत असे प्रकल्प, खाणकाम, खनिज उत्पादने, त्याची वाहतूक, तसेच खाण कामाकरीता आवश्यक असणारे स्फोटके यांचा पुरवठा, नगर परिषदा/नगर पंचायती क्षेत्राबाहेरील ग्रामीण भागातील वीटभट्टी, गव्हाचे पीठ, कडधान्य, डाळी, खाद्यतेल यांचे उत्पादन /निर्मितीशी निगडीत असणारे मध्यम व लघु प्रकल्प विशिष्ट अटीवर आणि परवानगी घेऊन सुरू करता येतील.शेतीशेतीविषयक कामे सुरूसर्व कृषी आणि बागायती उपक्र म पूर्णपणे कार्यरत राहतील. शेतकरी व शेतमजूर यांच्याकडून करण्यात येणारी शेतीविषयक विविध कामे, कृषिविषयक वस्तु/सेवांची खरेदी विक्री करणाऱ्या संस्था, ज्यामध्ये किमान आधारभूत किंमत देणाऱ्या संस्थांचा समावेश असेल (भात, तूर, कापूस व हरभरा यांची खरेदी), कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे संचलित किंवा शासनाने अधिसूचित केलेले बाजार, राज्य सरकारमार्फत संचालित ऑनलाईन मार्केट, एफपीओ सहकारी संस्थाद्वारे तसेच शेतकरी व शेतकऱ्यांचा समूह यांचेकडून खरेदी करणारे केंद्रे व गावपातळीवर खरेदीला प्रोत्साहन देणारे केंद्रे, शेतीसाठी लागणारी यंत्रांची दुकाने, कीटकनाशके, बियाणे, खत इ.चे निर्मिती करणारे व वितरण तसेच किरकोळ विक्री करणारे केंद्र सुरू राहणार आहेत.तेंदूपत्ता संकलन व वाहतुकीस परवानगीकिरकोळ वन उत्पादनाशी संबंधित कामे (संकलन, प्रक्रि या, वाहतूक व विक्री) ज्यांमध्ये पेसाअंतर्गत, पेसा व्यतिरीक्त व संरक्षित वन क्षेत्रात होणारे तेंदुपत्ता संकलनाचे काम तसेच तेंदुपत्त्याची विक्री केंद्रापर्यंत, गोदामापर्यंत वाहतुकीची कामे, वन क्षेत्रातील वाळलेले/पडलेले लाकुड यापासून उत्पादन होणारी संभाव्य आग (वणवा) टाळण्यासाठी उक्त लाकडाचे संकलन, वाहतूक आणि विक्री करण्यास परवानगी राहणार आहे.सामाजिक क्षेत्र संबंधाने उपक्र मबालसंगोपन गृहे, दिव्यांगाची देखभाल करणारी गृहे, जेष्ठ नागरिक, निराधार, परित्यक्त्या यांचा सांभाळ/देखभाल करणारी ठिकाणे, निरीक्षण गृहे, किशोरवयीन मुलांकरिताची सुधारगृहे, वयोवृध्द, विधवा, स्वातंत्र्य सैनिक, तसेच निवृत्ती वेतन आणि भविष्य निर्वाह संस्थेकडून पुरविण्यात येणाऱ्या भविष्य निर्वाह निधीची सेवा सुरू राहतील. अंगणवाडीअंतर्गत लाभार्थीं यांना १५ दिवसातुन एक वेळ द्वारपोच अन्नपदार्थ व पोषणद्रव्य यांचे वितरण करायचे आहे.३ मे पर्यंत हे बंदच राहणारबस वाहतूक, जिल्ह्यांतर्गत किंवा जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, शैक्षणिक व प्रशिक्षण देणाºया संस्था, सूट दिलेल्या भागातील सोडून इतर सर्व औद्योगिक व वाणिज्य प्रकल्प, अतिथ्य सेवा, आॅटो-सायकल रिक्षा तसेच कॅब सेवा, चित्रपटगृहे, मॉल्स, खरेदी संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, सभागृह इ., तसेच सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्र म, सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे बंदच राहतील. तसेच अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त लोकांच्या जमावास बंदी राहणार आहे.सूट दिलेल्या घटकांच्या यशस्वी अंमलबजावणीची जबाबदारी सामान्य नागरीकांची आहे. प्रत्येक उद्योग व व्यवसाय सुरू करावयाच्या कामांसाठी प्रशासनाची परवानगी गरजेची आहे. जर अशा सुरू केलेल्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी गर्दी वाढलेली दिसल्यास किंवा आवश्यक संसर्ग उपाययोजनांची अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा सूट दिलेले घटक १४४ कलमात समाविष्ट करण्यात येतील. जिल्हा कोरोनामुक्त राहण्यासाठी आपणा सर्वांना हा लढा पुढे अखंड सुरू ठेवायचा आहे. लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता देण्यात येत आहे. याचा दुरूपयोग होता कामा नये.- दीपक सिंगला, जिल्हाधिकारीकुरियर, चष्म्यांची दुकाने सुरूजीवनावश्यक वस्तुची निर्मिती करणारे प्रकल्प, ई-कॉमर्स सेवा जसे अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे यांना केवळ जीवनावश्यक वस्तु, औषधे, कुरीयर पार्सल घरपोच वितरीत करता येईल. किराणा दुकान, राशन दुकान, स्वच्छता विषयक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने, चष्म्यांची दुकाने, फळे, भाजीपाला, डेअरी, दुध केंद्र, पोल्ट्री, मांस, मच्छी दुकाने, वैरण, चारा यासाठीची दुकाने चालू राहण्यास दररोज सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत परवानगी राहणार आहे. परंतु त्या ठिकाणी सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक राहणार आहे.

टॅग्स :agricultureशेती