शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

नक्षल्यांविरोधात जनआक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 01:44 IST

मागील पंधवरड्यात नक्षल्यांनी आठ आदिवासी बांधवांची निर्घृण हत्या केली. या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी भूमकाल रॅली काढून नक्षल्यांचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. दुर्गम भागातही नक्षल्यांविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून आला.

ठळक मुद्देनिषेध नोंदविला : हत्येच्या निषेधार्थ ठिकठिकाणी काढली रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील पंधवरड्यात नक्षल्यांनी आठ आदिवासी बांधवांची निर्घृण हत्या केली. या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी भूमकाल रॅली काढून नक्षल्यांचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. दुर्गम भागातही नक्षल्यांविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून आला.आदिवासींना जल, जंगल, जमिनीचे स्वप्न दाखविणाऱ्या नक्षलवाद्यांनी भूमकाल दिनाच्या पर्वावर जिल्ह्यातील ताडगाव परिसरातील कसनासूर येथे सहा आदिवासींना पळवून नेऊन तीन आदिवासींची क्रुरपणे हत्या केली. गावातील नागरिकांच्या घरगुती सामानाची नासधूस करून त्यांना गाव सोडण्यास भाग पाडले, असा आरोप भूमकाल रॅलीतून नागरिकांनी केला. तसेच धोडराजवळील जुव्वी नाला, एटापल्लीतील ताडगुडा, विसामुंडी येथे प्रत्येकी एकाची तर धानोरा तालुक्यातील सावरगाव हद्दीत दोघांची हत्या नक्षल्यांनी केली. तसेच काही भागात आदिवासींना मारहाण केली. जाळपोळ करून मालमत्तेचा नुकसान केले. काही भागात लाल कापडी बॅनर लावून जनतेमध्ये दहशत निर्माण केली, असा आरोप जनआक्रोश रॅलीतून नागरिकांनी केला.नक्षलवाद्यांच्या या कृतीमुळे दुर्गम भागातील आदिवासींना विकासापासून वंचित ठेवले जात आहे, असा आक्रोश रॅलीच्या माध्यमातून नागरिकांनी व्यक्त करीत नक्षल्यांच्या कृतीचा निषेध नोंदविला. शनिवारी जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील ५५ ठिकाणी नक्षलविरोधी भूमकाल रॅली काढण्यात आली.ठिकठिकाणच्या या रॅलीत हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले. हातात विविध घोषणांचे फलक हातात घेऊन नक्षल्यांच्या कृतीचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला.