शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याची चव महागणार; वातावरणाचा फटका, मोहोर गळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 14:44 IST

Gadchiroli : लोणची बनविण्यासाठी असणार कैऱ्यांचा तुटवडा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एरव्ही पौष महिन्यात आंब्याला मोहोर लागतो. यंदा केशर, देवगड, दशेरी, लंगडा, आंब्यासह सर्व कलमी आंब्यांना मोहोर लागला आहे. मात्र, पौष महिना संपला तरीही गावरान आंबे बहरलेले नाहीत. त्यामुळे यंदा गावरान आंब्यांसह संकरित आंब्यांचे दर वधारण्याची शक्यता आहे.

जिल्हाभर मोठ्या प्रमाणात कलमी आंबे बहरावर आहेत. मात्र, गावरान आंबे मोहोरलेले क्वचितच दिसून येत आहेत. पूर्वीसारख्या गावरान आंब्याच्या आमराया राहिल्या नाहीत. काही शेतकऱ्यांनी बांधावर अनेक ठिकाणी गावरान आंबे लावले आहेत. शिवाय, शेतकऱ्यांकडून गावरानऐवजी कलमी आंब्याची लागवड करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आमराया संपुष्टात आल्या. आजही अनेकजण गावरान आंब्यांनाच पसंती देतात. मात्र, यंदा गावरान आंब्यांचे प्रमाण कमी आहे. 

गावरान आंब्यांना एक वर्ष आड मोहोर का येतो ?एक वर्ष आड मोहोर येण्याची प्रवृत्ती आंब्यांमध्ये पाहायला मिळते. त्या आंब्यांच्या प्रजातीमधील हा आनुवंशिकपणा आहे. ही प्रवृत्ती संकरित आंब्यांमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे संकरित आंबे लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

आमराया नष्ट, उरली बांधावरची झाडेजिल्ह्यात अनेक गावांमध्ये आमराया होत्या. . या आमराया आता दिसून येत नाहीत. अनेकांनी सरपणासाठी आमरायांची कत्तल केली, तर काहींनी लाकडांसाठी आमरायांची तोड करून विक्री केली. आता केवळ बांधांवर गावरान आंब्यांची झाडे दिसून येतात

लोणची बनविण्यासाठी कैऱ्यांचा तुटवडागावरान आंब्याची झाडे नष्ट होत असल्याने गावरान आंबा फार कमी प्रमाणात आढळून येतो. परिणामी, लोणचं बनविण्यासाठी गावरान कैऱ्या मिळत नाहीत. अनेकजण तर वर्षभर रेडिमेड लोणची बाजारातून खरेदी करतात.

"गावरान आंब्यांना दरवर्षीच बहर येत नाही. अनेक आंबे एक वर्ष आड मोहोरतात. हा त्यांचा आनुवंशिकपणा असतो. कोकणातील अनेक शेतकरी या समस्येवरसुद्धा प्रयोग करून उत्पादन घेतात."- सुचित लाकडे, विषयतज्ज्ञ, उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली